शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार आरटीओत नागरिकांचा होतो खोेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:22 IST

अनेक तास पाहावी लागते वाट : अधिकारी येतात स्वत:च्या मर्जीनुसार

हुसेन मेमन लोकमत न्यूज नेटवर्क जव्हार : जव्हार प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई-विरार यांच्या माध्यमातून जव्हार येथे गुरुवारी आरटीओ कॅम्प चालविला जातो. मात्र, या कॅम्पला आरटीओचे अधिकारी आपल्या मर्जीनुसारच्या वेळेत येत असल्याने नागरिकांना अनेक तास वाट पाहत बसावे लागते. परिणामी, नागरिकांचा मोठा खोळंबा होत आहे. जव्हार येथे वाडा मार्गावर आमराई गार्डन येथे एका माळावर वाहनचालकांची पाहणी करून त्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याची व अन्य कामे आरटीओकडून होतात. अनेक वर्षांपासून हा कॅम्प सुरू असला तरी अद्यापही कायमस्वरूपी जागा आरटीओला उपलब्ध होऊ शकलेली नाही.

वाहनचालकाने वाहन चालविण्याचा परवाना मिळावा यासाठी येथे नोंदणी केली असता त्याला आरटीओमार्फत भेटीसाठी ठरावीक वेळ दिली जाते. जी साधारण सकाळी ११ च्या सुमाराची असते. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील वाहनचालक परवान्यासाठी येथे वेळेत उपस्थित राहून रांगा लावतात. मात्र येथील अधिकारी मनात येईल तेव्हा, स्वत:च्या वेळेप्रमाणे उपस्थित राहतात. त्यामुळे ते अधिकारी येईपर्यंत नागरिकांना उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी, वाहनचालकांचा हिरमोड होतो. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन नोंदणी करून दलालांकडून होणारी फसवणूक टाळण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी आजही आरटीओच्या बाजूला दलालांचाच वेढा दिसतो. सामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. 

मला सकाळी ११ ची वेळ दिली होती ; मात्र, अधिकारी १.४० ला आल्याने उन्हात ताटकळत राहावे लागले.- मुकेश पाटील, वाहनचालक

ऑनलाइनद्वारे नोंदणीने लूट थांबेल, अशी अपेक्षा होती.मात्र, आरटीओभोवती दलालांची गर्दी आहे.  - भीमराव बागुल, अध्यक्ष, गवंडी बांधकाम मजूर संघटना

टॅग्स :thaneठाणे