शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
3
IPO मध्ये १ लाख गुंतवले, आता त्याचे राहिले फक्त ₹३,२००; कसं मोठ्या आयपीओंनी बनवलं गुंतवणुकदारांना कंगाल
4
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
5
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
6
“यालाही हनी ट्रॅप म्हणायचे का?”; फोटोला फोटोने उत्तर, ठाकरे गटाच्या आरोपावर भाजपाचा पलटवार
7
सोने, चांदी, बिटकॉइन स्वस्त होणार? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा दावा; वॉरेन बफेही 'त्या' क्षणाची वाट पाहतायेत?
8
एअर इंडियाच्या बोईंग जेटच्या फ्युएल कंट्रोल स्विचची तपासणी पूर्ण; समोर आली महत्त्वाची माहिती
9
Video - स्टंटगिरी! हिरो बनण्याच्या नादात मर्सिडीज थेट समुद्रात नेली, दलदलीत अडकली अन्..
10
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
11
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
12
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
13
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
14
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
15
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
16
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
17
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
18
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
19
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
20
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी

पोलीस अधीक्षकांचीच जनता दरबाराला दांडी!

By admin | Updated: August 12, 2016 01:28 IST

पोलिसांविरोधात असलेला रोष वसईत गुरूवारी झालेल्या जनता दरबारात प्रकट झाला खरा परंतु नागिरकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसई : पोलिसांविरोधात असलेला रोष वसईत गुरूवारी झालेल्या जनता दरबारात प्रकट झाला खरा परंतु नागिरकांनी केलेल्या अनेक तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अनेक तक्रारीत गुन्हे दाखल होते तर काही तक्रारी अदखलपात्र होत्या असे पोलिसांनी स्पष्ट केले. वसईतल्या नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी वसई जनआंदोलन समितीच्या पुढाकाराने हा जनता दरबार आयोजित क़रण्यात आला होता. मात्र, आधी वेळ देऊनही पोलीस अधिक्षक जनता दरबारात आल्या नाहीत. तर अपर पोलीस अधिक्षकही बैठकीसाठी निघून गेल्याने पोलीस उपअधिक्षकांनी तक्रारी ऐकून त्यांचा निपटारा केल्याने प्रारंभी संतापलेले जनआंदोलनाचे र्काकर्ते नंतर शांत झाले.वसई विरार मधल्या पोलीस ठाण्यात नागरिकांच्या तक्रारी पोलीस नोंदवून घेत नाहीत असा आरोप जनआंदोलन समितीने केला होता. त्यासाठी नागरिकांचा हेल्प डेस्क स्थापन क़रण्यात आला होता. ज्या नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. तसेच पंधरा आॅगस्ट नंतर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे पालघरच्या पोलीस अधिक्षकांनी गुरूवारी वसईत जनता दरबाराचे आयोजन केले होते. मात्र पोलीस अधिक्षिका शारदा राऊत या दरबारात उपस्थित राहू शकल्या नाहीत. तसेच अपर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांच्या कार्यालयातच हा जनता दरबार असतांनाही ते ही पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघून गेले होते. त्यामुळे जनआंदोलनाचे कार्यकर्ते संतापले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून विभागीय पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी हा दरबार घेतला. त्यात ४१ तक्रारी करण्यात आल्या. त्यात फसवणूक, घोटाळे, महिला अत्याचार आदींचा समावेश होता. सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. आमच्याकडे आलेल्या तक्रारदारांचे आम्ही निरसन केले आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्याबाबात सूचना दिल्या. अनेक तक्रारींमध्ये यापूर्वीच गुन्हे दाखल होते असे उपअधिक्षक अनिल आकडे यांनी सांगितले. बलात्कारा प्रकरणी गुन्हा दाखल करत नाही अशी तक्रार होती पण त्याही प्रकरणात आरोपीला अटक केली होती असे ते म्हणले. काही तक्रारींमध्ये तथ्य नव्हते. अनेक तक्रारी या दिवाणी स्वरूपाच्या होत्या. काही तक्रारी पालिकेविरोधातील होत्या अशीही माहिती त्यांनी दिली. प्रत्येक नागरिकांच्या तकारी नोंदवून घ्याव्यात तसेच पिडितांना ताटकाळत ठेवू नये अशा सूचना उपअधिक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना दिल्या. तक्रारदारांचे समाधान झाले नाही तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)