शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

जानेवारीमध्ये ठाणे पुर्वेत गावदेवी जत्रौत्सव व पालखी सोहळा, जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:21 IST

दरवर्षी प्रमाणे यंदाही पौष पौर्णिमेला ठाण्यातील सुप्रसिद्ध गावदेवी मातेचा जत्रौत्सव व पालखी सोहळा पार पडणार आहे. या जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना मिळणार आहे.

ठळक मुद्देजानेवारीमध्ये ठाणे पुर्वेत गावदेवी जत्रौत्सव व पालखी सोहळाजत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांनामहाविद्यालयीन विद्यार्थी नऊवारी साडीत बुलेट चालविणार

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली ठाणे पूर्वेकडील कोपरीगावची आराध्य देवता गावदेवी (चिखलादेवी) जत्रौत्सव व पालखी सोहळा १ व २ जानेवारी २०१८ रोजी संपन्न होत आहे. १ जानेवारी रोजी पालखी सोहळा व २ जानेवारी रोजी जत्रौत्सव ठाणे पुर्वेत संपन्न होणार आहे अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.       संपूर्ण महाराष्ट्रात पौष पौर्णिमेला जत्रा व पालखी सोहळा सुरू होता. या सोहळयात दरवर्षी ठाणे पुर्वेकडील आई गावदेवी (चिखलादेवी) मातेचा पालखी सोहळ््यास दरवर्षी पहिला मान मिळतो व त्यानंतर महाराष्ट्रातील पालखी व जत्रौत्सवास सुरूवात होते. मोठ्या थाटामाटात हा सोहळा ठाणे पुर्वेकडील कोपरीगावातील गावदेवी सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळी साजरा करतात. या जत्रौत्सवाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहेत तर पालखी सोहळ््यास यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. कोपरी गावातील ग्रामस्थ मंडळे हा सोहळा पार पाडण्यासाठी दोन महिने अगोदर पुर्व तयारी करतात. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून या गावदेवी (चिखलादेवी) मातेचे दर्शन घेण्यासाठी यावेळी हजेरी लावतात. तब्बल दोन लाखांहून अधिक भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंदिरावर या दिवशी विविध छटांची रोषणाई केली जाते तर दरवर्षी या मंदिरास रंगविले जाते. देवीच्या गाभाºयात या दोन दिवसांत सप्तरंगी फुलांनी व रोषणाई सजविले जाते. १ जानेवारी रोजी या मंदिरातून दुपारी मोठ्या उत्सवात पालखी सोहळा सुरू होतो व ही पालखी संपूर्ण ठाणे पुर्वमध्ये कोपरीगावात फिरुन परत रात्री याच मंदिरात विसर्जन होते. या पालखी सोहळ््यात लेझीम, ढोल रथक, भजनीमंडळी, विविध वेशभूषाकार सहभागी होणार आहे. यंदाच्या सोहळ््यात महाविद्यालयीन विद्यार्थी नऊवारी साडीत बुलेट चालविणार आहेत.या सोहळ््याचा दुसरा दिवस हा जत्रौत्सवाचा असून यावेळी मंडळचे अध्यक्ष पाटील पत्नीसह पालखी झाल्यावर रात्री १२ वाजता देवीचे अभिषेक व पूजा करणार आहेत. त्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. या वर्षी सोहळ््यात महिला लाल रंगाच्या तर पुरूष पांढºया रंगाचे कपडे परिधान करणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई