शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका परिवहन बस सेवेला जानेवारीचा मुहूर्त

By सदानंद नाईक | Updated: December 26, 2023 17:34 IST

दोन चार्जिंग स्टेशन सज्ज.

उल्हासनगर : महापालिका परिवहन बससेवेचा दिवाळी मुहूर्त हुकला असला तरी जानेवारी महिन्यात परिवहन बस सेवा सुरू होण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. ई-बससाठी २ चार्जिंग स्टेशन सज्ज असून केंद्र शासनाकडून येणाऱ्या १०० बसेस नवीन वर्षातच महापालिका परिवहन सेवेत दाखल होणार आहेत.

उल्हासनगर महापालिकेची ठप्प पडलेली परिवहन बस सेवा सुरू करण्यासाठी आयुक्त अजीज शेख यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला. अखेर शासनाच्या स्वच्छ अभियान अंतर्गत निधीतून महापालिकेने एकून २० बसेस खरेदी केल्या. २० पैकी १० लहान व १० मोठ्या आकाराच्या बसेस आहेत. लहान आकाराच्या बसेस शहर अंतर्गत तर मोठ्या आकाराच्या बसेस वातानुकूलित असून त्या लांब पल्याच्या मार्गावर धावणार आहेत. दिवाळीपूर्वी एक बस ट्रायलसाठी शहरात आली होती. त्यावेळी दिवाळीला बस सेवा सुरू होण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले होते. दरम्यान केंद्र शासनाने १०० इलेक्ट्रिकल बसेसला मंजुरी दिली. त्यामुळे महापालिका परिवहन विभागाच्या ताफ्यात एकून १२० परिवहन बसेस राहणार आहेत. शहाड उड्डाण फुल शेजारी महापालिका भूखंडावर बस आगर व इलेक्ट्रिकल चार्जर स्टेशन उभारण्यात येत आहे. त्यातील दोन ,चार्जिंग स्टेशन सज्ज असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.

महापालिकेकडे परिवहन बस सेवेसाठी सुखसुविधा उपलब्ध नसल्याने, बस सेवा खाजगी ठेकेदारा मार्फत चालविण्यात येणार आहे. मात्र त्यावर महापालिकेचे पूर्णतः नियंत्रण राहणार असल्याची माहिती आयुक्त शेख यांनी दिली. दिवाळी पासून बस सेवेचा लाभ मिळण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी सुरवातीला दिले होते. मात्र त्याला नवीन वर्ष उजाडणार असून जानेवारी महिन्यात बसेसचा मुहूर्त साधला जाणार आहे. परिवहन बस सेवा, सिंधू भवन व महापालिका रुग्णालयाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे बोलले जात असून तिन्ही विकासकामाच्या उदघाटनासाठी मुख्यमंत्री यांची तारीख मिळण्यासाठी राजकीय नेते व महापालिका प्रशासन सक्रिय आहे. 

 नवीन वर्षात बस धावणार

महापालिका परिवहन बस सेवा जानेवारी महिन्यात सुरू होण्याचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. मुख्यमंत्री यांच्या संमतीनुसार उद्घाटनाची तारीख ठरविली जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर