शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या विद्यार्थिनींनी ‘लम्पी’वर शोधला घरगुती उपाय

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 19, 2022 12:39 IST

बालविज्ञान संमेलनात प्रकल्पाचे सादरीकरण

प्रज्ञा म्हात्रेठाणे : राज्यात लम्पी आजाराने थैमान घातले असताना अडीच हजारांहून अधिक जनावरे संक्रमित झाले होते. या आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील खिरोदा गावातील नववीच्या विद्यार्थ्यांनी घरगुती उपचार शोधून काढला. लम्पी होऊ नये,यासाठी स्प्रे तर जखम झाल्यावर लेप हे दोन्ही घरगुती उपायांचा त्यांनी शोध लावला. खिरोदा गावातील घरांमध्ये सर्वेक्षण केल्यावर जनावरांना या उपायांचा फायदा झाल्याचा दावा या विद्यार्थिनींनी ‘लोकमत’शी बोलताना केला. 

धनाजी नाना विद्यालय या शाळेच्या श्रेया चौधरी आणि महेक तडवी या विद्यार्थिनींनी भारती बढे या शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली ‘जनावरांच्या लम्पी आजारावर घरगुती उपाय’ या विषयावर प्रकल्प तयार केला आहे. हा प्रकल्प त्यांनी कळवा येथील सहकार विद्यालयात आयोजित केलेल्या बालविज्ञान संमेलनात सादर केला. श्रेया आणि महेक यांनी सांगितले की, खिरोदा गावात ज्यावेळी लम्पीची साथ मोठ्या प्रमाणात आली, त्यावेळी अनेक जनावरांचे बळी गेले. तर काहींमध्ये हा आजार संक्रमित झाला. त्यावेळी या आजारावर घरगुती उपाय शोधता येईल का असा विचार केला. हळद चंदनपावडर,शहद,नारळ तेल यापासून लेप तर कापराच्या वड्या, मस्टर्ड तेल, डिझेल यापासून स्प्रे तयार केला. जिथे जनावरे जिभेने स्पर्श करू शकत नाही अशा भागांनाच स्प्रे मारण्यात आला आणि लम्पी या आजारामुळे झालेल्या जखमांवर लेप लावण्यात आला. 

लेप लावल्यानंतर ही जनावरे दोन ते तीन दिवसांत बरे झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. खिरोदा गावातील २५ घरांमधील जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे आढळल्याचे श्रेया आणि महेक या विद्यार्थिनींनी सांगितले.

ही होती लक्षणेजनावरांमध्ये जास्त प्रमाणात ताप येणे, अशक्त वाटणे, तोंड सुजणे, पाय सुजणे, नाकातून पाणी गळणे, वजन कमी होणे, दूध देणे बंद करणे ही लक्षणे आढळल्याचे या विद्यार्थिनींनी सांगितले.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग