शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:00 IST

ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून हा समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे.

ठाणे : ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून हा समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात नवकार मंत्रजप कार्यक्रमात काढले. यावेळी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मुनिवर्य जयप्रभ विजयजी (जे. पी. गुरु जी) यांनी त्यांचा गौरव करून मुक्तकंठाने प्रशंसा केली.यावेळी ठाणे व मुलुंड परिसरातील हजारो जैनबांधव उपस्थित होते. जितोच्या ठाणे शाखेच्या स्थापनेवेळी ठाण्यातील हाजुरी येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्रासाठी तर उथळसर येथे शाळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. त्याची पूर्तता केल्याबद्दल जैन मुनींच्या उपस्थितीत त्यांचा गौरव केला.यावेळी शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय सुविधा केंद्राच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. येत्या चार महिन्यांत हे वैद्यकीय सुविधा केंद्र ठाणेकरांच्या सेवेत रु जू होणार आहे तर ठाणे महापालिकेच्या पुढील महासभेत शाळा उभारणीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. कार्यक्र माला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, आ. रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे जितोचे अध्यक्ष महेंद्र जैन, जितोचे सर्व पदाधिकारी व एमसीएचआय-क्रेडाइचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवर उपस्थित होते.जे. पी. गुरु जींचे गौरवोद्गारमुनिवर्य जे. पी. गुरु जी यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी जागवताना शिंदे यांच्यात आनंद दिघे यांचा भास होत असल्याचे गौरवोद्गार काढले. दिघे यांचा सहकार्याचा वारसा शिंदे पुढे चालवत असल्याचे गुरु जी म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे