शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

महापौर चषक भजन स्पर्धेत जय हनुमान मंडळ विजेते; २० मंडळांनी घेतला सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 23:42 IST

ठाणे महापालिकेने आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आर्य क्रीडा मंडळ येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.

ठाणे : ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत एकूण २० भजनी मंडळे सहभागी झाली होती. यात २० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मुरबाड येथील जय हनुमान प्रासादिक मंडळाने पटकाविले. तर १५ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक सुरताल भजनी मंडळ, नारंगी यांनी आणि १० हजार रुपयांच्या तृतीय पारितोषिकावर कर्जतच्या नादब्रह्म भजनी मंडळाने आपले नाव कोरले. स्पर्धेत पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक अनुक्रमे संतकृपा भजनी मंडळ, विटावा व श्री गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मालाड यांनी पटकाविले.

ठाणे महापालिकेने आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आर्य क्रीडा मंडळ येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. तिचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृहनेते अशोक वैती, क्रीडा आणि समाज कल्याण आणि सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियांका पाटील, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक पवन कदम, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा त्याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

वैयक्तिक पारितोषिके वैयक्तिक पारितोषिकांमध्ये कल्पेश शिंगोळे यांनी उत्कृष्ट पखवाजवादक, सिद्धेश चव्हाण यांनी उत्कृष्ट झांजवादक, सर्वेश पांचाळ यांनी उत्कृष्ट तबलावादक, भूषण देशमुख यांनी उत्कृष्ट गायनाचे तर मकरंद तुळसकर यांनी उत्कृष्ट हार्मोनियमवादक म्हणून बक्षीस मिळवले. या प्रत्येकास पाच हजारांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे मुख्य परीक्षक म्हणून पं. भीमसेन जोशींचे शिष्य नंदकुमार पाटील हे होते. नितीन वर्तक व भूषण चव्हाण यांनीही परीक्षण केले.