शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ठाण्यातील संगीत कट्ट्यावरील संगीतमय संध्याकाळ झाली देव आनंद मय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:00 IST

नवोदित तसेच हौशी गायकांसाठी स्वतःच्या कलेच्या सादरीकरणासाठी हक्काचा कट्टा म्हणजे संगीत कट्टा.

ठळक मुद्देसंगीत कट्ट्यावरील संगीतमय संध्याकाळ झाली देव आनंद मयस्वतःच्या कलेच्या सादरीकरणासाठी हक्काचा कट्टा म्हणजे संगीत कट्टासंगीत कट्टा ५६ सजला युवा तसेच अनुभवी गायक आणि वादकांच्या सोबत

ठाणे : संगीत कट्टा ५६ सजला युवा तसेच अनुभवी गायक आणि वादकांच्या सोबतच तरुण गायक वादकांनी देवानंद यांच्यावर चित्रित गीतांचे सादरीकरणाने कट्ट्यावरील संगीतमय संध्याकाळ देव आनंद मय झाली.

    देव आनंद स्पेशल संध्याकाळ एक वेगळ्याच अर्थाने खास झाली.सादर कार्यक्रमात देव आनंद सारख्या चिरतरुण स्वरांच्या ज्येष्ठ नागरिकांसोबत तरुण गायक आणि वादकांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून खरोखरच संध्याकाळ देव आनंद मय  केली. *वासुदेव फणसे ह्यांनी 'जीवन के सफर मै','खोया खोया चांद'; दिलीप नारखेडे ह्यांनी हे 'अपना दिल तो आवारा' ,'फुलो को तारो का'; सुधीर जामखंडीकर 'हाय हाय रे निगाहे','कहा जा रहे थे';अनंत मुरे ह्यांनी 'मै आया हु'; पांडुरंग कदम ह्यांनी 'मेरा मन तेरा प्यासा','तेरे मेरे सपने','तू कहा है'; संदीप गुप्ता 'ख्वाब हो या हकीकत','न तुम हमे जानो'; प्रवीण शहा 'कोई सोने स दिलवाला','कल की दौलत आज'; सुधाकर कुलकर्णी ह्यांनी 'तू कही ये बता'; अरुण मांडलिया चल री सजणी ; किरण म्हाफसेकर ह्यांनी 'फुलो का तारोका'; हरीश सुतार ह्यानी 'तेरे मेरे सपने'; प्रणव कोळी ह्यानी 'ये दिल ना होता बेचारा' आणि राजू पांचाळ ह्यांनी 'ऐसें ना मुझे तुम देखो'* ह्या गीतांचे सुरेल सादरीकरण केले. कीर्ती जोशी आणि दिलीप नारखेडे ह्यांनी 'याद किया दिल' ; हरीश सुतार आणि पूजा ह्यांनी 'छोड दो आचल; राजू पांचाळ आणि निशा पांचाळ ह्यांनी 'अच्छा जी मै हारी'; विनोद पवार आणि बीना ह्यांनी 'पन्ना की तमन्ना है; ज्ञानेश्वर मराठे आणि गौरी ठाकूर ह्यांनी 'याद किया दिलने'; हरीश सुतार आणि कांचन ह्यांनी 'अभि ना जावो छोडकर','आसमा के नीचे'; किरण म्हाफसेकर आणि गौरी ठाकूर ह्यांनी आंखो मैं क्या जी;विनोद पवार आणि निशा पांचाळ ह्यांनी  'शौखिया मै'; ज्ञानेश्वर मराठे आणि बीना 'तुझे जीवन की डोर से बांध लिया है'; किरण म्हाफसेकर  आणि पूजा ह्यांनी 'कांची रे कांची'* ह्यां सुमधुर युगुल गीतांचे सादरीकरण केले.

ह्या सर्व युगुल गीतांमधील *विनोद पवार आणि साक्षी पवार ह्या बाप लेकीच्या  जोडीने गायलेल्या 'गाता रहे मेरा दिल' ह्या गीताने रसिक श्रोत्यांची खास दाद मिळवली.  या सोबतच तेजराव पंडागळे ह्यांनी 'लेके पहला पहला प्यार'* ह्या गीताचे बासरीवर सुरेल सादरीकरण केले. *दामिनी पाटील हिने 'दम मारो दम'* ह्या गीतांचे सेकसोफोनवर जबरदस्त सादरीकरण केले. *राज आणि कुणाल ह्या जोडीने सिंथेसायझर आणि ट्रम्प पॅड वर 'जब छाये मेरा जादू'* ह्या गीतांचे सादरीकरण करून रसिक श्रोत्यांची वाहवा मिळवली.सादर *संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या कलाकार आरती ताथवडकर ह्यांनी केले. आठवड्याभराच्या दगदगीनंतर शुक्रवारची संध्याकाळ रसिक श्रोत्यांना आनंदीत करणारी असावी आणि नवोदित आणि हौशी कलाकारांना संधी मिळावी म्हणूनच संगीत कट्टा सुरू करण्यात आला.आज देव आनंद विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ आणि तरुण गायक आणि वादकांनी स्वतःच्या कलेचे सादरीकरण करून खऱ्या अर्थाने चिरतरुण देव आनंद  ह्यांना आदरांजलीच वाहिली असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकDev anandदेव आनंद