शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपांचे निराकरण करावे लागणे दुर्दैवी

By admin | Updated: April 24, 2017 02:22 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तीवर चिखलफेक  करण्यात काही जणांना धन्यता वाटते. त्यांची देशभक्ती, निर्भयता, हेतू यावर शिंतोडे उडवणे हे आपले  दुर्भाग्य आहे. इतर कोणत्याही देशात तेथील स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या थोर व्यक्तिंवर आधारित आक्षेप आणि निराकरण असे कार्यक्रम झालेले ऐकले आहेत का? मात्र आपण स्वा.सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण या विषयावर परिसंवाद घेण्यात शक्ती दवडतोय, हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल, असे स्पष्ट मत डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केले.गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात रविवारी ‘सावरकरांवरील आक्षेप आणि निराकरण’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. १९११ ते १९४८ या कालावधीत सावरकरांनी मांडलेले विचार, भूमिका, कृती यावर आक्षेप घेतले जातात. यातील काही आक्षेप ते जिवंत असतानाच घेतले होते आणि विशेष म्हणजे त्याचे निराकरण स्वत: सावरकरांनी केले. स्वातंत्र्य, हिंदुत्व , विज्ञाननिष्ठा आणि मानवतावाद या सावरकरांच्या जीवननिष्ठा तर भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श लक्षात घेतल्यास त्यांच्यावर आक्षेप घेणे किती निराधार, कपोलकल्पित आणि हास्यास्पद आहे, हे लक्षात येते. मुख्य म्हणजे स्वा.सावरकरांवर आक्षेप घेणारी मंडळी स्वत: प्रामाणिक आहेत का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे गोडबोले म्हणाले. सावरकर झाले नसते तर पाकिस्तानचा आकार आहे त्यापेक्षा मोठा झाला असता आणि अखंड पाकिस्तानच्या प्रक्रियेला खूप वेग आला असता. ब्रिटीश येथून गेल्यावर ती जागा मुस्लिम घेतली ही भीती लक्षात घेत सावरकरांनी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे शब्द वापरून भलमोठं तत्वज्ञान उभ केलं, असे प्रतिपादन अरविंद कुलकर्णी यांनी केले. बंदीवासात असलेल्या सावरकरांवर झालेल्या अनेक आक्षेपांचे प्रा. गजानन नेरकर यांनी निराकरण केले. यावेळी उपस्थित सावरकरप्रेमींच्या प्रश्नाला मान्यवर वक्त्यांनी उत्तरे दिली. (प्रतिनिधी)