शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कलेक्टर बनण्यासाठी फक्त १०० रुपये लागतात - प्रा. डॉ. काठोळे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 12, 2023 17:18 IST

आयएएसची परिक्षा देण्यासाठी ३५ टक्के गुण आवश्यक असुन पूर्वपरिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फक्त २५ टक्के गुण आवश्यक असतात.

ठाणे : भारतीय नागरी सेवेंत जाण्यासाठी आवश्यक असणारे आयएएसचे शुल्क फक्त १०० रुपये आहे.तेव्हा, डॉक्टर बनायला २ कोटी इंजिनिअर बनायला ५० लाख लागतात. अन, कलेक्टर व्हायला मात्र अवघे १०० रुपयेच लागतात. अशी माहिती देत मिशन आय.ए.एस.चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी 'स्पर्धा परिक्षांचे आव्हान' सुलभ करून सांगितले. तसेच,आपल्याकडे याबाबत पुरेशी जनजागृतीच होत नसल्याने पालकांना आणि मुलांना याची माहितीच नसल्याची खंतही व्यक्त केली.

ठाण्यात आयोजित ३७ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प बुधवारी सरस्वती शाळेच्या पटांगणात मिशन आय.ए.एस.चे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी गुंफले. यावेळी व्यासपीठावर या सत्राचे अध्यक्ष सुहास पाटील होते. डॉ. काठोळे यांनी उपस्थितांना केलेल्या मार्गदर्शनात , विद्यार्थ्यामंध्ये स्पर्धा परीक्षाविषयी असलेली भीती व न्युनगंड घालवुन सकारात्मकता जागृत करुन जोषपूर्ण आवाहन केले. यावेळी त्यांनी शेरोशायरी तसेच संतवचने सांगुन भारतीय नागरी सेवेंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय अधिकारी पदाची परिक्षा देण्यासाठी अभ्यासाच्या सोप्या पद्धती व त्यातील बारकावे समजावून सांगितले.

आयएएसची परिक्षा देण्यासाठी ३५ टक्के गुण आवश्यक असुन पूर्वपरिक्षा उत्तीर्ण करण्यासाठी फक्त २५ टक्के गुण आवश्यक असतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोजचे काम रोजच करा. स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी दररोज ३० प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे प्रा. काठोळे यांनी सांगितले. त्याचबरोबर दररोजचे वर्तमानपत्रे वाचुन त्यातील माहिती फाईलमध्ये 'एबीसीडी अशी अल्फाबेटनुसार संकलित करा. यामुळे तुमचे सामान्य ज्ञान अद्ययावत राहते.जी मुले ५ वी ते १२ वी पर्यतचा अभ्यास काळजीपूर्वक करतात,ते आयएएस परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात. कारण त्यांचा बेस पक्का झालेला असतो. तेव्हा, वेळेचे योग्य नियोजन करा. एक रुटीन तयार करा आणि त्याप्रमाणे तयारी करा. अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका. असे प्रबोधन करताना प्रा. काठोळे यांनी, " पंख होने से कुछ नही होता, हौसलो से उडान होती है । हा शेर आवर्जुन श्रोत्यांना सांगितला.