शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य; प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले मत

By अजित मांडके | Updated: June 12, 2023 16:20 IST

ठाणे शहरातील नाले सफाई, रस्त्यांची सुरु असलेली कामे आदी प्रश्नाबाबत आमदार सरनाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची ठाणे महापालिका मुख्यालयात भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या मुद्यावरुन स्थानिक पातळीवर सध्या भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाºयांमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे. त्यात आता  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील यावर भाष्य केले आहे. २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना भाजप युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत  गेले होते. त्यामुळे यावर भाष्य करणे उचीत होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यावर स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. तर मंत्रीमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही  लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

ठाणे शहरातील नाले सफाई, रस्त्यांची सुरु असलेली कामे आदी प्रश्नाबाबत आमदार सरनाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची ठाणे महापालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी सध्या ५० टक्के  शहरात नालेसफाई झाली असल्याचे  आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले. उरलेली नालेसफाई त्वरित करण्यात यावी  ही  मागणीही आयुक्ताकडे केली. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आयुक्तानी दिली होती. पण आजही रस्त्यांची कामे सुरु आहेत. ती लवकर पूर्ण करावी ज्याने नागरिकांना वाहतूक त्रास होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच जोडीला ओवळा माजिवडा  विधानसभा क्षेत्रातील  विविध विकासकामाबाबत ही सरनाईक यांनी आयुक्ताशी यावेळी चर्चा केली.

दरम्यान भाजप ने ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. याबाबत त्यांना छेडले असता, मुळात २०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना भाजपा युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत  गेले होते. परिणामी याबाबत मी बोलणे उचित होणार नाही. यावर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. तर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार विस्तार लवकरच होईल. पण राज्यात सध्या असलेले २० मंत्री हे उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर तुमचा मंत्रीमंडळात समावेश होईल का? असा प्रश्न विचारला असता त्यावर सरनाईक यांनी थेट बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी मागील तीस वर्षांपासून काम करत आहेत. ते दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे. परिणामी ते दिलेला शब्द पाळतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक