शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर व्हीनस चौकातील उद्यानाचे अस्तित्व धोक्यात, भिंत पडली, कारवाई नाही

By सदानंद नाईक | Updated: November 13, 2022 17:53 IST

उल्हासनगर व्हीनस चौकातील उद्यानाचे अस्तित्व धोक्यात असल्याचे समोर आले आहे. 

उल्हासनगर (ठाणे) : कॅम्प नं-४ व्हीनस चौकातील मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेने सन-२०१८ मध्ये १५ लाख खर्चून उभारलेल्या उद्यानाचे अस्तित्व धोक्यात आले. शेजारील सुरू असलेल्या इमारत पुनर्बांधणी वेळी उद्यानाची भिंत पडूनही महापालिकेने काहीएक कारवाई केली नसल्याने स्थानिक नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगर महापालिका व्हीनस चौक मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रते बसत होते. या भाजी विक्रेतेमुळे वाहतूक कोंडी होती. असा शोध लावून महापालिकेने ४० वर्ष जुन्या भाजी विक्रेत्यांना हुसकावून देत रस्त्याच्या बाजूला १५ लाख रुपये खर्चातून साई वशानशहा यांच्या नावाने उद्यान बांधले. यावेळी माहितीच्या नावाखाली मागितलेल्या माहितेत महापालिकेने रस्त्यावर उद्यान बांधल्याची कबुली दिली होती. उद्यान बांधले तेंव्हा पासून बंद असून उद्यानाची दुरावस्था झाली. दरम्यान शेजारील सोसायटीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झाल्यावर, उद्यानाची भिंत पडली. महापालिका संपत्तीचे नुकसान झाल्याची ओरड महापालिकेने करून कारवाई करायला हवी होती. मात्र उद्यानाची भिंत पडूनही बघ्याच्या भूमिकेत असल्याने, महापालिका कारभारावर टीका होत आहे.

व्हीनस चौकात मोर्यानगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बांधलेले उद्यान सार्वजनिक रस्त्यावर बांधल्याची माहिती, माहितीच्या अधिकाराखाली महापालिकेने सन-२०१८ साली दिली होती. मात्र बांधलेल्या उद्यानाची जागा ही शेजारील सोसायटीच्या जागेत येते. असी माहिती महापालिका नगररचनाकार विभागाकडून देण्यात येत असल्याने, विभाग पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विभाग वादात सापडला असून मृत महिलेच्या नावाने बांधकाम परवाना देणे, विठ्ठलवाडी अम्ब्रॉसिया हॉटेल शेजारील आरक्षित भूखंडावर बांधकाम परवाना दिल्यावर, जागेवर दुसऱ्याने हक्क सांगणे, आतातर जागेची सनदच्या चौकशीची मागणी प्रांत कार्यालय व नगररचनाकार विभागाने शासनाकडे केली. तसेच रिस्कबेस बांधकाम परवानगीच्या नावाखाली बहुमजली बांधकाम झाल्याच्या तक्रारी आहेत. मात्र कारवाई नाही. असा अनेक वादात नगररचनाकार विभाग सापडले आहे. 

रस्त्यावर उद्यान बांधलेच कसे? महापालिकेने रस्त्यावर १५ लाख खर्च करून उद्यान बांधलेच कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी समाजसेवक नरेश तहेलरामानी यांनी महापालिकेकडे केली. सोसायटीच्या जागेत उद्यान बांधल्याचे, आताच कसे बोलले जात आहे. आदीमुळे उद्यानाचे अस्तित्व धोक्यात असून १५ लाख पाण्यात गेले. या प्रकरणी सबंधीतावर कारवाईची मागणी व उद्यानाची भिंत पडल्या प्रकरणी कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.  

 

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर