शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
2
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
3
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
4
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
5
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
6
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
7
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
8
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
9
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
10
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
11
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
12
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
14
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
15
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
17
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
18
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
19
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
20
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   

कायद्यांच्या जाचामुळे पाककला व्यवसाय बनला अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 03:09 IST

डोंबिवली : सरकारच्या विविध कायद्यांच्या जाचांमुळे पाककला व्यवसाय करणे अवघड आहे.

डोंबिवली : सरकारच्या विविध कायद्यांच्या जाचांमुळे पाककला व्यवसाय करणे अवघड आहे. त्यामुळे ‘भीक नको पण कु त्रं आवर’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच, डोंबिवलीत तरी व्यवसाय सुरू करणार नाही, असे प्रसिद्ध पाककलातज्ज्ञ विष्णू मनोहर यांनी स्पष्ट केले.‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे ‘पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमांतर्गत मनोहर यांच्या मनमुराद गप्पांचा कार्यक्रम रविवारी सुयोग मंगल कार्यालयात झाला. या वेळी मनोहर यांच्या पदार्थांची चव चाखता यावी, म्हणून खवय्यांनी त्यांना आपला व्यवसाय डोंबिवलीत सुरू करण्याविषयी विचारले असता त्यांनी वरील विधान केले.मनोहर म्हणाले, पाककला हे खूप व्यापक शास्त्र आहे. एखाद्या पदार्थात लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची वापरली किंवा एखादा घटक न वापरताही पदार्थ बनवता येतो. त्यामुळे क ोणत्याही पदार्थांचे पेटंट घेण्याच्या भानगडीत मी पडत नाही. जागतिक विक्रम करताना प्रथम घरातून विरोध होता. पण, कामानिमित्त अमेरिकेला गेलो होतो. तेथून परतल्यावर जागतिक विक्रम करायचा, अशी कंबरच कसली. पण, जेव्हा माझ्या आधीच्या व्यक्तीने ४० तासांचा रेकॉर्ड केल्याचे समजले, तेव्हा मी थोडा घाबरलो. पण, तपश्चर्या व सराव करून हा विक्रम केला. हा रेकॉर्ड माझ्या पाककलेच्या प्रेमापोटीच करू शकलो.मनोहर पुढे म्हणाले, सर्वात प्रथम मी ढोकळा बनवला होता. परंतु, त्यांचा ढोकळा काही झाला नाही. त्यानंतर, सहावीत असताना आवळा सुपारी बनवली. आवळा सुपारी बॉक्समधून शाळेत विकत असे. लहानपणापासून व्यवसाय करण्याची आवड होती. आवळा सुपारीमुळे ती रुची वाढत गेली. कॅटरिंग या व्यवसायाचे मी कोणतेच प्रशिक्षण घेतले नाही. शाळेत पास व्हायचो. शाळेत जितका अभ्यास केला नाही, तेवढा अभ्यास आता करावा लागत आहे. आतापर्यंत ५० च्या वर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागत आहे. ‘याराना’ हा चित्रपट पाहून लोकांनी आपल्याला आमंत्रित करावे, असे काही करण्याची ही इच्छा जागृत झाली. एखाद्याला हे वाटणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.>पदार्थ करताना वेगळेपण जपापाककला ही ६४ कलांपैकी एक कला आहे. पदार्थ करताना तुम्ही टेक्निक वापरत असता, म्हणून तुम्ही टेक्निशियन आहात. पदार्थ बनवताना रंग, पोत पाहिला जातो. म्हणून, त्यात विज्ञान येते. पदार्थ आकर्षक दिसावा म्हणून प्रेझेंटेशन महत्त्वाचे असते. म्हणून, तुम्ही चांगले आर्टिस्ट असता. तुमचा प्रत्येक पदार्थ इनोव्हेटिव्ह असावा. आम्ही सांगतो तसाच पदार्थ करण्याची गरज नाही. तुमचे वेगळेपण जपा. त्यातूनच नवीन पदार्थांची निर्मिती होत असते. पारंपरिक पदार्थ म्हणून आपण ज्या पदार्थांना ओळखतो, ते कुणीतरी आधी केले होते. तसेच तुम्ही पदार्थात वेगळेपणा जपला, तर तुमचा पदार्थही भावी पिढीसाठी पारंपरिक पदार्थ बनेल. पदार्थ बनवताना प्रेझेंटेशन आणि पोषणमूल्य दोन्हींचा समतोल राखला पाहिजे. डाएट करताना आपल्याला त्यांचा कंटाळा येईल, असे करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.>नटसम्राटांची हुबेहूब नक्कलनटसम्राट चित्रपटातील ‘टु बी और नॉट टु बी’ हा संवाद नाना पाटेकर यांच्या आवाजासारखा हुबेहूब आवाज काढून मनोहर यांनी सादर केला. पाटेकर यांचा हुबेहूब आवाज काढल्याने प्रेक्षकांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. याच संवादाच्या लाइनवर ‘डाएटिंग’विषयी संवाद मनोहर यांनी तयार केला आहे. तोही त्यांनी या वेळी सादर केला. या संवादाला प्रेक्षकांकडून वन्स मोअरची दाद मिळाली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली