शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तेरा वर्षीय डॉक्टरकन्येचा मृत्यू डेंग्यूनेच झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:37 IST

पालिकेचा दुजोरा : रुग्णालयाला नोटीस

ठाणे : वर्तकनगर परिसरातील एका १३ वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची माहिती रु ग्णालय सूत्रांनी दिली. पालिकेच्या आरोग्य विभागानेही त्या मुलीचा मृत्यू हा डेंग्यूनेच झाल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर या रुग्णाची माहिती उशिराने दिल्याने संबधित खाजगी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटिस बजावणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर ज्या भागात ती राहत होती, त्या भागातील आजूबाजूच्या पाच नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारतींमध्येही डेंग्यूच्या अळ्या आढळल्या असून विकासकांनाही नोटिसा बजावल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांनी सांगितले.

ठाणे येथील वर्तकनगर भागात १३ वर्षीय मुलगी राहत होती. तिचे वडील डॉक्टर आहेत. काही दिवसांपासून ती आजारी होती. ३ जुलै रोजी तिला ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ५ जुलै रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला डेंग्यूची लागण झाली होती आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. तिचा मृत्यू डेंग्युमुळेच झाल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी केंद्रे यांनी सांगितले. त्यानुसार तिच्या घरातील चार जणांची रक्ताची तपासणी केली आहे. त्यांच्या घरातील फ्लॉवर पॉटमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचेही त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांनी माहिती देणे बंधनकारकखाजगी रुग्णालयांनी डेंग्यू किंवा इतर महत्त्वाच्या आजाराचा रुग्ण दाखल झाला असेल तर त्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, रुग्ण मृत पावल्यानंतरही त्याची माहिती खाजगी रुग्णालयाने न दिल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटिस बजावली असून माहिती उशिरा कळविण्यामागचे कारण त्यात विचारल्याचे त्यांनी सांगितले.