शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘कल्याण-शीळ’वरील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल; आमदारांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:55 IST

डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर परिसरातून या परिसरात येणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत  आहेत. 

डाेंबिवली :  कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संरक्षक उपाययोजना म्हणून लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक रस्ते वाहतुकीने प्रवास करत असल्याने कल्याण-शीळ महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. ते या कोंडीत तासन्तास अडकून पडत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. या समस्येची गंभीर दखल घेऊन नागरिकांना कोंडीतून सोडवावे, त्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. 

चव्हाण यांनी बुधवारी फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीबाबत चर्चा झाली. पलावा-शीळ या अवघ्या १२ मिनिटांच्या प्रवासासाठी तासभरापेक्षा जास्त अवधी लागत आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर परिसरातून या परिसरात येणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत  आहेत. 

प्रवासाचे सात तास आणि कामावरचे आठ तास, असा सध्या त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कामावरच्या तणावापेक्षा प्रवासाचा तणाव जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सातत्याने नागरिक त्याबाबतच्या तक्रारी सांगतात. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी तेथील गर्दीचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. 

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चाप लावा 

  •  वाहतूककोंडी फोडण्यासाठी चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच चाप लावावा. लेनची शिस्त न पाळता केवळ पुढे जाण्याच्या उद्देशाने अन्य वाहनांच्या मध्येच घुसणाऱ्या वाहनचालकांवर सक्त कारवाई करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
  •  कल्याण-शीळ रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण सध्या सुरू आहे. मात्र, हे काम संथ सुरू असल्याने त्याबाबत सबंधितांना कामे जलद करण्यासाठी सूचना देणे गरजेचे आहे. 
  •  आमदार म्हणून सर्व सहकार्य करण्याची आपली तयारी आहे. मात्र, सामान्यांचा त्रास कमी झालाच पाहिजे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.
टॅग्स :kalyanकल्याणTrafficवाहतूक कोंडी