शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्टेडिअमचा मुद्दा राष्ट्रवादीवरच बुमरँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:52 IST

मुंब्य्रातील स्टेडीअम उभारून तीन वर्षे झाली तरीदेखील आजही ते सुरु केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी तेथील स्थानिक नगरसेवकांनी महासभेत हगांमा केला.

ठाणे : मुंब्य्रातील स्टेडीअम उभारून तीन वर्षे झाली तरीदेखील आजही ते सुरु केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी तेथील स्थानिक नगरसेवकांनी महासभेत हगांमा केला. येथे कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसल्याचे सांगून स्टेडीअम सुरू करण्याकामी भाजपा आमदाराने आडकाठी केल्याचा आरोप केला. त्यामुळे भाजपाचे नगरसेवकही आक्रमक झाले. मात्र, राष्टÑवादीच्या मदतीला शिवसेना धावल्याने भाजपाचे नगरसेवक एकाकी पडल्याचे चित्र सभागृहात दिसून आले. अखेर ज्या आमदाराने हे पत्र पालिकेला दिले होते. त्या पत्राचे वाचन झाल्यानंतर स्टेडीअमचा उल्लेख कुठेच नसल्याचे स्पष्ट झाल्याने या नगरसेवकांवरच आरोपाचा मुद्दा बुमरँग झाला.महासभा सुरू होताच, मुंब्य्रातील नगरसेवकांनी हाती बॅनर घेऊन तेथील स्टेडीअम सुरू करण्यासाठी आंदोलन केले. परंतु, सभागृहात अशा पद्धतीने निषेध करणे चुकीचे असल्याचे सांगून बाजू मांडण्याचे आवाहन केले. त्यानुसार या स्टेडीअमसाठी ४० कोटी खर्च करूनही ते तीन वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे येथील मुलांनी खेळण्यासाठी जावे कुठे असा सवाल राष्टÑवादीचे नगरसेवक राजण किणी यांनी केला. तर भाजपा आमदारांच्या पत्रामुळेच ते आजही खुले होऊ शकले नसल्याचा आरोप नगरसेवक शानु पठाण, सिराज डोंगरे आदींसह राष्टÑवादीच्या इतर नगरसेवकांनी केला. त्यामुळे भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले. भाजपा आणि राष्टÑवादीचे नगरसेवक आक्रमक झाले असतांनाच सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी या संधीचा फायदा घेऊन गुगली टाकून केलेल्या आरोपात तथ्य असेल तर, त्या आमदाराचे नाव जाहीर करावे अशी मागणी केली. त्यानंतर संजय केळकर यांच्यामुळेच हे काम थांबल्याचा आरोप केल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. त्या पत्राचे वाचन व्हावे, अशी मागणी भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी केली. परंतु, ते होईपर्यंत राष्टÑवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक हे भाजपावर तुटून पडल्याचे दिसून आले.दरम्यान या पत्राचे वाचन झाले आणि त्यात निविदा न काढता शहरातील स्टेडि0अमची कामे कोणालाही देता येऊ नये, निविदा काढून पारदर्शक कामे केली जावीत, अशी मागणी केळकर यांनी पत्रात केली होती. परंतु, यामध्ये मुंब्य्रातील स्टेडीअमचा उल्लेख कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे भाजपाने पुन्हा राष्टÑवादी नगरसेवकांना टार्गेट केले.