शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा अधिवेशनात ठाण्यातील तरुणीचा विषय लावून धरणार! अंबादास दानवेंचा इशारा

By जितेंद्र कालेकर | Updated: December 17, 2023 23:11 IST

न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ठणकावून सांगितले

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे येथे एमएसआरडीसी व्यवस्थापकाच्या मुलाने तरुणीला मारहाण करून तिला जाणीवपूर्वक गाडीची धडक दिली. त्यामुळे त्याच्या विरोधात तातडीने कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा हिवाळी अधिवेशनात हा विषय लावून धरणार असल्याचा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी दिला.

यातील अपघातग्रस्त पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कटिबद्ध असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली. यातील पिडित तरुणीची दानवे यांनी रविवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात भेट घेतली. तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी महिला पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही उपस्थित होते. या घटनेतील अश्वजीत गायकवाड याने जाणीवपूर्वक गाडी अंगावर घातली आणि तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले.

व्यक्तिगत विषय आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम पोलिसांनीही लावले नसल्याचा आरोप पिडितेने दानवे यांच्याकडे केला. त्याच अनुषंगाने अश्वजीत हा कोणाचा मुलगा आहे, कोण आहे आहे? यापेक्षा पोलिसांनी कायद्याचे पालन करावे, अशा सूचना दानवे यांनी तपास करणाऱ्या पोलिसांना दिल्या. पोलिसांनी फक्त बेधडकपणे गाडी चालविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप दानवे यांनी केला. तसेच या घटनेत दुसरी व्यक्ती असती तर त्याला अटक केली असती.कायदा हा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे वैद्यकीय अहवालाप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करणे अपेक्षित असल्याचेही दानवे म्हणाले.

टॅग्स :thaneठाणे