शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

महापालिकेच्या आणखी ४ विभागांना आयएसओ मानांकन

By धीरज परब | Updated: January 30, 2023 13:10 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या आणखी ४ विभागांना आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे. 

मीरारोड -

मीरा भाईंदर महापालिकेच्या आणखी ४ विभागांना आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले असल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे. 

जनसंपर्क अधिकारी राज घरत यांनी सांगितले कि ,  आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रशासकीय अधिकारी व  कर्मचाऱ्यांसह नागरीकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा यासाठी प्रत्येक विभागाचे विकेंद्रीकरण करुन त्यातील कारभारात सुसूत्रता आणण्यास सुरूवात केली. त्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले. महापालिकेच्या विभागांना आयएसओ दर्जा देण्याकरीता पालिकेने मेसर्स दि एन. क्वालिटी सर्व्हिसेस या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या कंपनीद्वारे सुकाणू समितीची स्थापना करून मुख्य समितीत ४ उपसमित्या स्थापन केल्या. या उपसमित्या संबंधित विभागांचे डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड व हाऊसकिपींग, ट्रेनिंग, फिडबॅक देतील असे ठरविण्यात आले. 

विभागातील प्रत्येक विषयाच्या विस्तृत व मुद्देसूद लिखाणासह प्रत्येक पदांच्या जबाबदाऱ्या व अधिकार निश्चित करण्यात आले. विभागांतील संकलनानुसार अभिलेख यादी तयार करुन कक्ष अद्यावत करण्यात आला. कक्ष व कार्यालयातील पदनिहाय प्रशिक्षणाच्या विषयांची यादी तयार करुन त्याचे वार्षिक नियोजन करण्यासह वैयक्तिक प्रशिक्षणाच्या नोंदी प्रत्येक विभागात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता पर्यंत  सिस्टम अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमार्फत अग्निशमन विभाग, आस्थापना, सामान्य प्रशासन, लेखा व अभिलेख विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. तर आता सार्वजनिक बांधकाम, मिळकत, विद्युत व सचिव विभागास आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे . आयुक्त ढोले यांच्या हस्ते सदर विभागांच्या प्रमुखांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.