शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

करोडोंचा महसूल बुडवल्या प्रकरणी मीरा भाईंदर महापालिकेची शासनाच्या आदेशाने चौकशी सुरु

By धीरज परब | Updated: March 3, 2024 09:12 IST

औरंगाबाद विभागीय नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांचे विशेष तपासणी पथक

धीरज परब / ठाणे (मीरारोड ) - नोंदणीकृत करारनामा करून मुद्रांक शुल्क भरलेला नसताना  मीरा भाईंदर महापालिकेने अनेक विकासक , अधिकारपत्र धारकांना बांधकाम परवानग्या , टीडीआर दिला आहे . या शिवाय अनेक विकसन करार , कार्यकंत्राट , भाडेपट्टात मुद्रांक शुल्क भरले नसल्याच्या प्रकरणी शासनाच्या आदेशाने ९ शासकीय अधिकाऱ्यांचे पथक महापालिकेच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेचे काही अधिकारी , विकासक व राजकारणी आदींनी संगनमताने अनोंदणीकृत करारनामे वा कुलमुखत्यारपत्र द्वारे मुद्रांक शुल्क न भरताच बांधकाम परवानग्या देण्यात आल्या आहेत . त्याच पद्धतीने टीडीआर मोठ्या प्रमाणात दिले आहेत .   भाडेपट्टा करारात सुद्धा शासनाचा महसूल बुडवण्यात आला आहे .  

अश्या प्रकारे शासनाचा करोडो रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवतानाच अनोंदणीकृत करारनामे द्वारे बेकायदेशीर व बेनामी काळा पैश्यांचा व्यवहार करण्यात आल्याचे आरोप व लेखी तक्रारी गेल्या अनेक वर्षांपासून सजी आयपी, राजू गोयल, अमोल रकवी , अजय धोका , प्रदीप जंगम , कृष्णा गुप्ता आदींनी मुद्रांक निरीक्षक व शासना कडे केल्या होत्या. संबंधितांवर गुन्हे दाखल करून दंडासह शासन शुल्क वसूल करा , अनोंदणीकृत करारनामे आधारे दिलेल्या बांधकाम परवानग्या , टीडीआर रद्द करा अशी मागणी केली जात आहे . तर काही प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडे चौकशीचा फार्स चालला आहे . 

या प्रकरणी ठोस कारवाई होत नसल्याने अमोल रकवी व अजय धोका यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या कडे तक्रारी केल्या होत्या . तक्रारीतील गांभीर्य आणि सकृतदर्शनी उपलब्ध  कागदोपत्री पुरावे पाहता महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी सुनील जाधव यांनी  राज्याचे  नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना पत्राद्वारे ९ अधिकाऱ्यांचे तपासणी  पथक नेमल्याचे कळवले आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या विविध कार्यालयातील टीडीआर हस्तांतरण करार , विकसन करार , कार्यकंत्राट , भाडेपट्टा आदी व्यवहारात यथोचित मुद्रांक शुल्क शासकीय जमा लेखांकन यंत्रणा मार्फत राज्य शासनाला भरले आहे कि नाही याची सुनिश्चीती व तपासणी करण्यासाठी हे पथक नेमले आहे . 

सर्व कागदपत्रे , नोंदी आदी दस्तांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद विभागीय  नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली ९ जणांचे विशेष तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे . त्या मध्ये   १ नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, १ सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी , १ सहायक नगररचनाकार  व प्रत्येकी २ सह दुय्यम निबंधक वर्ग २ , दुय्यम निबंधक श्रेणी १ आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे . 

सदर पथकास तपासणीसाठी आवश्यक सर्व दस्तावेज , करार , नोंदवह्या आदी उपलब्ध करून देण्यास महापालिकेला सांगितले आहे . मुद्रांक व नोंदणी कायद्यातील तरतुदीं नुसार काटेकोर आणि निःपक्षपातीपणे करावी . तपासणी पथकाने तपासात अन्य गैरमार्गाचा अवलंब केल्यास वा अनियमितता केल्यास शासना कडून शिस्तभंगाची कडक कारवाई करण्याचा इशारा शासन पत्रात देण्यात आला आहे . 

पथकाने आठवड्याभरात केलेल्या तपासणीचा अहवाल दर सोमवारी राज्याचे  नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांना स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सादर करायचा आहे . तर संपूर्ण तपासणी अहवाल १५ मार्च २०२४ पर्यंत सादर करण्याचे आदेश महसूल व वन विभागाचे कार्यासन अधिकारी सुनील जाधव यांनी पत्रात दिले आहेत . 

काही दिवसां पासून तपासणी पथक हे महापालिकेच्या कनकिया येथील नगररचना कार्यालयात तळ ठोकून आहे. तेथील दस्तऐवज ची तपासणी करत आहेत.