शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाला तरुणाचा खून, तरुणीच्या भावासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:56 IST

अवघ्या पाच तासांत या प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांनी प्रेयसीच्या भावासह तिघांना रविवारी अटक केली.

ठाणे : नळपाड्यातील धर्मवीरनगरात रविवारी सायंकाळी झालेला खून आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अवघ्या पाच तासांत या प्रकरणाचा उलगडा करून पोलिसांनी प्रेयसीच्या भावासह तिघांना रविवारी अटक केली.धर्मवीरनगरातील कै. श्रीपत पाटील गार्डनला लागून असलेल्या मैदानामध्ये २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आढळला. मृताच्या खिशामध्ये पोलिसांना पॅनकार्ड आणि एका तरुणीचे छायाचित्र मिळाले. पॅनकार्डवरून त्याचे नाव वसीम रशीद फकीर खान असल्याचे समजले. मात्र, त्यावर पत्ता नसल्याने पोलिसांनी तरुणीच्या छायाचित्रावरून तपास सुरू केला. पोलिसांकडून चौकशी सुरू असताना ती धर्मवीरनगरचीच रहिवासी असल्याचे समजले. तिला विचारपूस केली असता मृतक भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील रहिवासी असल्याचे समजले. त्याला दोन अपत्ये असल्यामुळे तिच्या दोन्ही भावांचा प्रेमसंबंधास विरोध होता. रविवारी दुपारी तिचे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या दोन मित्रांनी विवियाना मॉलजवळून वसीमला आॅटोरिक्षामध्ये सोबत घेतले.धर्मवीरनगरकडे जाताना त्यांनी वसीमला समजावण्याचा प्रयत्न केला. यातूनच वाद होऊन धर्मवीरनगरातील मैदानामध्ये आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला. तिच्याकडून ही माहिती मिळाल्यानंतर चितळसर पोलिसांनी तपासचक्र वेगात फिरवून तीन आरोपींना अटक केली. तिचा भाऊ रतनलाल ऊर्फ सोनू राजनाथ यादव (२६), त्याचे दोन मित्र पोखरण रोड क्रमांक २ वरील अरशद अबुलहसन खान (२१) आणि बाळकुम येथील विवेक सिकंदर यादव (२३) ही आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिचा दुसरा भाऊदेखील या प्रकरणात आरोपी असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली.चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.