शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:41 IST

खेळाडूंना वूडन कोर्टवर तसेच कमी प्रकाशझोतात सराव करून राष्ट्रीय स्पर्धेत उच्च प्रकाशझोतात मॅट्सवर खेळावे लागत होते. परंतु, आता आंतरराष्टीय दर्जाचे कोर्ट तयार करण्यात आले आहे.

ठाणे : विकासात्मक धोरणासोबतच क्रीडा क्षेत्रातही ठाण्याचा नावलौकिक होण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विशेष प्रयत्नाने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथील कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये नवीन कोर्ट मॅट्स, आकर्षक रंगरंगोटी व एलईडी लाइटच्या साहाय्याने अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट बनवण्यात आले आहे.

यापूर्वी येथे खेळाडूंना वूडन कोर्टवर तसेच कमी प्रकाशझोतात सराव करून राष्ट्रीय स्पर्धेत उच्च प्रकाशझोतात मॅट्सवर खेळावे लागत होते. परंतु, आता आंतरराष्टीय दर्जाचे कोर्ट तयार करण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्यासह १५ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील पाच आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह १५० खेळाडू कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये सराव करत आहेत.

ठाणे महापालिकेने कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय पद्धतीचे बनवलेले बॅडमिंटन कोर्ट देशासाठी एक मानबिंदू ठरणार असून अनेक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय खेळाडू सय्यद मोदी बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीमधून तयार होतील, याची खात्री आहे.- श्रीकांत वाड (प्रशिक्षक)वूडन कोर्टवर सराव करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मॅटवर खेळताना त्रास होत होता. आता या सर्व अद्ययावत मॅट्स व लाइटमुळे सराव करणे सोपे झाले असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे वातावरण आता ठाण्यात निर्माण झाले आहे.- अमन संजय (राष्ट्रीय खेळाडू)देशातील अव्वल अशा गोपीचंद अकादमीच्या धर्तीवर कै. खंडू रांगणेकर बॅडमिंटन कोर्टवर सुविधा देण्यात आल्या असून या अद्ययावत मॅट्सवरील सरावाचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खूप फायदा होणार आहे.- व्ही. हारिका (राष्ट्रीय खेळाडू)

टॅग्स :BadmintonBadminton