शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या मंडईमध्ये चक्क चित्रीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:29 IST

ग्राहकांना झाला त्रास : पालिकेची परवानगी घेतली नव्हती

भार्इंदर : मीरा- भार्इंदर महापालिकेने कंत्राटावर दिलेल्या मंडईचा वापर चक्क चित्रीकरणासाठी केला जात आहे. यासाठी भाडे आकारले जात आहे. चित्रीकरणाची परवानगी घेतली नसल्याचे प्रभाग अधिकारी सांगत असले तरी कंत्राटदाराच्या प्रतिनिधीने मात्र चित्रीकरणासाठी परवानगी घेतली असल्याचे उत्तर दिले.

शहरातील रस्त्यांवर बसणारे भाजी, फळ विक्रेते आदी फेरीवाल्यांना महापालिकेने विविध आरक्षणांचे तसेच नाल्यांवरच्या स्लॅबवर मंडइसाठी परवानदी दिली आहे. मंडईसाठी शेड बांधून देण्यासह त्या ठिकाणी देखभाल ठेवणे व त्या बदल्यात फेरीवाल्यांकडून रोजचे शुल्क आकारण्याचे कंत्राट दिले आहे. मूळात जागेचा उद्देश व केला जाणारा वापर, नाममात्र दरात दिलेले कंत्राट, फेरीवाल्यांची पडताळणी न करताच त्यात कंत्राटदाराने बसवलेले फेरीवाले, जास्तीचे वसूल केले जाणारे शुल्क आदी अनेक मुद्दे उपस्थित झाले असताना कंत्राटदार व त्यामागील सूत्रधार हे सत्ताधारी भाजप नेतृत्वाच्या मर्जीतील असल्याने प्रशासन गप्प असल्याचा आरोप होत आहे.

रामदेव पार्क येथील मंडईचा वापर चक्क चित्रीकरणासाठी केला गेला. या ठिकाणी आवश्यक सामान आणले होते.मंडईमध्ये नृत्य चित्रीत केले जात होते. त्यामुळे मंडईत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या चित्रीकरणाचा त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता प्रभाग समिती कार्यालयाकडून मंडईत अशा कोणत्याही चित्रीकरणास परवानगी दिलेली नसल्याचे सांगितले.माझा काहीही संबंध नाही- पुरोहितमधुसुदन पुरोहित यांनी मात्र, मंडईतील चित्रीकरण विद्यार्थ्यांच्या प्रकल्पासाठी होते. ती वाणिज्य स्वरुपाची नव्हती. आधी त्यांचे चित्रीकरण रद्द झाले होते. त्यात माझा कंत्राटदार म्हणून काही संबंध नाही असे मधुसुदन पुरोहित यांनी सांगितले. या भागातील रहिवासी निलेश साहू यांनी मात्र कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे.