शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी लावण्यासाठी जागा अपुऱ्या; वाहनसंख्या झाली डाेकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 23:52 IST

घर, दुकान, सेवा रस्त्यांवर पार्किंग : वाहनसंख्या झाली डाेकेदुखी

अजित मांडकेठाणे :  ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. दुचाकींबरोबर चारचाकी वाहनांची संख्या वाढत असल्याने पार्किंगची समस्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. इमारतींच्या ठिकाणीदेखील पार्किंग मुबलक प्रमाणात नसल्याने अनेक वाहनचालकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र ठाण्यात आहे.

घोडबंदर भागातील सेवा रस्ता हा तर अडचणीचा ठरत आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती भागातील राम मारुती रोड, गोखल रोड, खोपट आदींसह इतर काही महत्वांच्या रस्त्यांवर अशाप्रकारे पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळून अपघातांची भीती व्यक्त होत आहे.ठाणे  शहरात वर्षागणिक वाहनांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी नवनवी गृहसंकुले उभी राहत असल्याने त्याठिकाणी वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांमुळेदेखील वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. 

आज शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे, तर वाहनांची संख्या ही जवळपास लोकसंख्येच्या आसपास पोहोचली आहे. शहरात आजघडीला २२ लाख १७ हजार ६९९ वाहने रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये सर्वाधिक १२ लाख ८२ हजार ६९९ दुचाकींची संख्या आहे, तर चार लाख ४९ हजार ७०७ एवढ्या चारचाकी आहेत.  त्यामुळे रस्तेदेखील अपुरे पडू लागले आहेत.

इमारतींमध्येही वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने अनेक ठिकाणी इमारतींच्या बाहेरील रस्त्यांवर वाहने लागलेली दिसतात. शहरातील हिरानंदानी इस्टेट गृहसंकुल असेल किंवा ब्रम्हांड व इतर मोठ्या गृहसंकुलांच्या ठिकाणीदेखील हीच समस्या आहे. वाहन रस्त्यांवर पार्क झाल्यानंतर वाहतूक शाखेकडून कारवाई होत आहे.

टॅग्स :thaneठाणेParkingपार्किंग