शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या फुप्फुसावरच महापालिकेचा घाला

By admin | Updated: February 11, 2017 03:48 IST

शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील तब्बल ७० झाडांची कत्तल करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे

मीरा रोड : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील तब्बल ७० झाडांची कत्तल करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सर्व्हिस रोड बनवण्यासाठी ही झाडे तोडण्याचे कारण पुढे केले जात असले, तरी येथील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे व मोठ्या होर्डिंग्जवर कारवाई केली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विकास आराखड्यात काशिमीरानाका ते भार्इंदरच्या सावरकर चौकापर्यंतचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग हा ४५ मीटरचा आहे. परंतु, पालिकेने हा रस्ता विकसित करताना तो केवळ १२० फुटांचाच केला. मुख्य रस्ता व जवळ नाला बांधला. पण, दोन्ही बाजूंना प्रत्येकी १० फुटांचा सर्व्हिस रोड पालिकेने तयार केलाच नाही. त्याविरोधात २००७ मध्ये डॉ. सुरेश येवले यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी महापालिकेने न्यायालयात तीन महिन्यांत सर्व्हिस रोड बांधू, असे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. आज १० वर्षे झाली, तरी पालिकेने सर्व्हिस रोड बांधला नाही. अतिक्रमणही हटवले नाहीत. याचिकाकर्ते डॉ. येवले सातत्याने महापालिकेकडे सर्व्हिस रोड बांधण्याची मागणी सातत्याने करत आहेत. सध्या या रस्त्यावर गॅरेजवाले, गाड्या विक्री करणारे तसेच हातगाड्यावाल्यांनी बेकायदा अतिक्रमण केले आहे. शिवाय, दुतर्फा बेकायदा पार्किंग होत आहे. महापालिकेकडून त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. पालिकेने दोन्ही बाजंूना १० फुटांचा सर्व्हिस रोड बांधण्यासाठी निविदा काढली आहे. त्यासाठी ३ कोटी ५६ लाख खर्च येणार आहे. हा रोड बांधताना तीन ठिकाणी एमएमआरडीएच्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या ठिकाणी सर्व्हिस रोड नंतर बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व्हिस रोडसाठी अतिक्रमणे, होर्डिंग्ज न हटवता ७० मोठी झाडे तोडण्याचे काम सुरू केले आहे. आयुक्तांच्या अखत्यारीतच हे अधिकार असल्याने झाडे तोडण्यास त्यांनीच मंजुरी दिलेली आहे. आधी अतिक्रमण हटवा, नंतर गरज पडल्यास झाडे पाडा, अशी तक्रार मनसे वाहतूक शखेच्या संतोष शाह यांनी पालिकेकडे केली आहे. झाडे तोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)