शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता, पाणीपट्टी वसुलीसाठी खासगीकरणाचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:12 IST

नगरसेवक काटेकर यांची स्पष्टोक्ती

भिवंडी : आर्थिक डबघाईस आलेल्या भिवंडी महापालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीचा ठेका खासगी कंपनीस देण्याखेरीज पर्याय नाही, अशी स्पष्टोक्ती माजी उपमहापौर नगरसेवक मनोज काटेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. भिवंडी महापालिकेची तहकूब महासभा बुधवारी झाली. काटेकर यांनी मालमत्ता करवसुलीचे खासगीकरणाबाबत दिलेले पत्र महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आयत्या वेळचा विषय म्हणून ऑनलाइन महासभेत चर्चेला घेत सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रशासनाने खासगीकरणाचा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले.काटेकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, भिवंडी महापालिकेची मालमत्ता व पाणीपट्टी कराची चालू वर्षात मागणी १०८ कोटी असून थकबाकी ३८० कोटी आहे. दोन्ही मिळून एकूण थकबाकी सुमारे ४८८ कोटी रुपयांची आहे. प्रत्येक वर्षी व्याज दरात शंभर टक्के सूट देऊनही जर फक्त १० टक्केही करवसुली होत नसेल तर शहरातील विकासकामे करायची कशी, असा प्रश्न त्यांनी केला. एलबीटीच्या आधारावर शासन दरमहा देत असलेले अनुदान कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यातच संपून जात असल्याने शहरातील प्रत्येक विकासकामांसाठी शासनाकडे याचकासारखे हात पसरण्याची वेळ येते. त्यामुळे खासगीकरणाच्या प्रस्तावास विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. प्रशासनाकडून मालमत्ता करांच्या वसुलीचे ठरविलेले वार्षिक इष्टांक हे १०८ कोटींचे असते, परंतु प्रत्येक वर्षी यापैकी २५ टक्के रक्कम वसूल होते. त्यास महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचार सर्वाधिक कारणीभूत असून त्यावर प्रशासन प्रभावी उपाययोजना करताना दिसत नाही. शहरातील सर्व मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे आहे. महापालिकेच्या दप्तरी ‘झोपडी’ची नोंद असलेल्या जागेवर प्रत्यक्षात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असून, त्या इमारतीकडून मालमत्ता कराची आकारणी झालेली नाही. मालमत्तांचा शाेध घेतल्यास ३०० काेटींचे उत्पन्नमालमत्तांचा शोध घेतल्यास वार्षिक ३०० कोटींचे उत्पन्न महापालिकेस मिळू शकते व त्यामुळे शहर विकासाला चालना मिळेल, असा विश्वास काटेकर यांनी व्यक्त केला. यावर्षी कोरोनामुळे महापालिकेची करवसुली जेमतेम नऊ ते दहा टक्के म्हणजे १८ कोटी ७३ लाख रुपये इतकीच झाल्याची माहिती काटेकर यांनी दिली.