शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

जखमी कामगार रुग्णालयातच

By admin | Updated: April 24, 2017 23:58 IST

दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या कामगाराच्या उपचारावरील खर्च दोन महिने उलटले, तरी न देणाऱ्या जांभूळवाड येथील

शहापूर/आसनगाव : दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या कामगाराच्या उपचारावरील खर्च दोन महिने उलटले, तरी न देणाऱ्या जांभूळवाड येथील अल्फाड गोट फार्महाउसच्या व्यवस्थापनाविरोधात येथील लाइफ केअर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रवीण कांगणे यांनी अखेर पोलिसांत तक्रार केली आहे. जखमी कामगार परप्रांतातील असून त्याच्याजवळ नजीकचे नातेवाईक नसल्याने आणि ज्या फार्महाउसवर तो काम करतो, त्या व्यवस्थापनाने दोन महिन्यांपासून त्याच्याकडे ढुंकूनही न पाहिल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडत चालल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अपघातानंतर फार्महाउसचे व्यवस्थापक रमजान यांनी कितीही खर्च झाला तरी चालेल, तुम्ही दवाउपचार करा. आम्ही होणारा खर्च देऊ, असे सांगितले होते. मात्र, हा उपचाराचा खर्च तर सोडाच, परंतु दोन महिने उलटले तरी त्यास बघण्यासाठीही कुणीच न फिरकल्याने डॉक्टर कांगणे यांनी अखेर पोलिसांत धाव घेतली.यासंदर्भात किन्हवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेखर डोंबे म्हणाले की, अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवला असून त्याची चौकशी सुरू आहे. आम्ही फार्महाऊसशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचे रुग्णालयाचे बिल वा वेतना संदर्भातील प्रश्न कामगार कायद्यांतर्गत असल्याने त्यात आम्ही काहीच करू शकत नाही. तर, गोट फार्महाउसचे मालक आणि व्यवस्थापकांशी मोबाइलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)