शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील रिक्षांमधून हरवली चालकांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 01:21 IST

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे   :  ठाण्यातील रिक्षांमधून प्रवाशांचा विशेष करून महिला प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, याकरिता चार वर्षांपूर्वी प्रत्येक रिक्षामध्ये त्या चालकाची संपूर्ण माहिती छायाचित्रसह लावणे बंधनकारक केले होते, परंतु आजघडीला अनेक रिक्षांमध्ये ती नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात शहरात नव्याने ज्या रिक्षांची भर पडलेली आहे, त्यामध्ये हे प्रमाण अधिकच असल्याचे आहे. त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे, यातील अनेक रिक्षाचालकांकडे चालकपरवाना परमीट आधीच नसल्याने ते माहितीच ठेवत नसल्याची बाबही समोर आली आहे.

एकीकडे टीएमटीच्या अपु:या बसमुळे प्रवाशांची गैरसोय होते, तर दुसरीकडे प्रवासी पर्याय म्हणून ज्या रिक्षांकडे पाहतात, ते रिक्षाचालक त्यांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक देतात. अशा वेळी प्रवाशांनी कुठे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, महिला प्रवासी तर अक्षरश: रडकुंडीला येत आहेत. 

ठाणे शहरात रिक्षाचालक आपल्या मर्जीनुसार रिक्षा चालवतात. रिक्षासेवा ही सामाजिक परिवहन सेवा असल्याचे भान नसल्यामुळे अनेक रिक्षाचालक रिक्षा रिकामी चालली असताना, गरजूंनी ती थांबविण्याचा इशारा केला असतानाही ते थांबवत नाहीत.

रिक्षा थांबविली तर प्रवाशाने जाण्याचे ठिकाण संगितल्यावर त्या ठिकाणी जाण्यास नकार देणे, आजारी, अपंग, ज्येष्ठ नागरिक महिला यांच्याबाबत असंवेदनशील पद्धतीने व्यवहार करणे, जवळचे भाडे नाकारणे, स्टेशनकडील मुख्य रांगेत न जाता स्टेशनच्या बाहेरील परिसरात उभे राहून विशिष्ट भागात जाण्यासाठी वेगळे स्टॅण्ड तयार करणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, रस्त्याच्या उलट्या दिशेने रिक्षा चालविणे, वाहतूक नियमांचे पालन न करणे अशा रिक्षांच्या संदर्भातील अनेक समस्यांना ठाणेकरांना सामोरे जावे लागते. पाेलिसांनी या प्रश्नी लक्ष घालावे अशी ठाणेकरांची मागणी आहे.

रश्मी करंदीकर यांनी केली होती माहितीची सक्तीकाही वर्षांपूर्वी ठाण्यात कापूरबावडी परिसरात एका युवतीशी एका रिक्षाचालकाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने चालत्या रिक्षातून उडी घेत स्वत:चा बचाव केला होता. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. यानंतर, ठाण्यात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी तत्कालीन पोलीस वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी प्रत्येक रिक्षामध्ये त्या त्या रिक्षाचालकांचा फोटो बॅच नंबर परवानाची माहिती त्याचा संपूर्ण पत्ता अशी माहिती चालकाच्या मागच्या बाजूला असणे बंधनकारक केले होते. त्यावेळी अनेक रिक्षाचालकांनी त्याला प्रतिसादही दिला होता, परंतु आता या रिक्षांमधील ही माहिती गायब झाली आहे.

माहिती एक, चालक दुसराच माहिती गायब होण्याचे मुख्य कारण म्हणजे यातील बहुतांशी रिक्षाचालकांकडे वाहनपरवाना आधीच नसतो, त्यामुळे ते कोणती माहिती देणार हाच मुळात प्रश्न आहे. त्यातही ज्या रिक्षांमध्ये अशा प्रकारची माहिती असते, त्यात अनेक वेळा दुसरेच चालक असतात. यातील बहुतांशी रिक्षाचालक हे तर परराज्यातील आहेत. त्यांना अनेक वेळा ठाण्यातील मार्गही माहित नसतात, अशा वेळी प्रवाशांची पंचाईत होते आणि त्यातून वाद निर्माण होतात, त्यामुळे आता ठाणे वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षांची कसून तपासणी करणे गरजेचे आहे.