शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांची माहिती आता मिळणार संकेतस्थळावर

By admin | Updated: June 1, 2016 02:23 IST

मीरा भार्इंदरमधील सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या आरक्षित भूखंडांवर झालेल्या अतिक्रमणांची माहिती मीरा भार्इंदरमधील सार्वजनिक

भाईंदर : मीरा भार्इंदरमधील सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या आरक्षित भूखंडांवर झालेल्या अतिक्रमणांची माहिती महापालिका आपल्या संकेतस्थळावर टाकणार आहे. जीएसआय पध्दतीने त्याचे मोजमाप घेऊन त्याचे नकाशे तसेच भूखंडाची सविस्तर माहिती लवकरच नागरिकांना थेट संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात ३८२ विविध आरक्षणे आहेत. या शिवाय रस्ते, तलाव, विहरी, सार्वजनिक इमारती, स्मशानभूमी, विविध निवासी प्रकल्पातील सुविधा भूखंड शहरात मोठ्या संख्येने आहेत. या सर्व सार्वजनिक व नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या भूखंडांना अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांपासून मुक्त ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. तसे असताना पालिका व लोकप्रतिनिधींच्या हेतूपुरस्सर दुर्लक्षतेमुळे असे सार्वजनिक भूखंड व रस्त्यांवर अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे झाली आहेत. शहरात खाजगी व सरकारी जागांवर सर्रास अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे होत असताना ते हटविण्याची कारवाई प्रभावीपणे करण्यात आली नाही. मूळात प्रत्येकाचे कुठे ना कुठे अर्थपूर्ण वा राजकीय लागेबांधे असल्याने अगदी पालिकेच्या ताब्यातील वा सुविधा भूखंडांवरील अतिक्रमणांना संरक्षणच देण्यात आले आहे. शहरातील आरक्षित भूखंडांवर असणाऱ्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांची माहिती देण्यास महापालिका प्रशासन माहिती अधिकारात देखील टोलवाटोलवी करते. अशाच एका प्रकरणात कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्त थँक्सी थकेकरा यांनी मीरा भाईंदर महापालिकेची चांगलीच कानउघाडणी केली आहे. शहरातील आरक्षणांची व त्यावर झालेल्या अतिक्रमणांची सद्यस्थितीची माहिती तयार करुन संकेतस्थळावर टाकण्याचे आदेश दिले आहेत. १० मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यात ही माहिती पालिकेने संकेत स्थळावर टाकायची आहे. ९ जुलैपर्यंत पालिकेला सर्व माहिती संकेतस्थळावर टाकावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने माहिती तयार करण्याच्यादृष्टीने प्रस्ताव तयार करुन त्यावर कार्यवाही करत आहे. जीआयएस मॅपिंग व माहितीसाठी अंदाजे २४ लाख खर्च होणार आहे. आयुक्त अच्युत हांगे यांनी त्यास मंजुरी दिली आहे. (प्रतिनिधी)