शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तरच इच्छापत्र किंवा बक्षिसपत्र वेळेवर करुन ठेवावे- ॲड. विशाल लांजेकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 10, 2024 16:22 IST

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न

ठाणे : आपल्या मृत्यू पश्चात जर आपल्या सर्व मिळकतीची, मालमत्तेची किंवा संपत्तीची वाटणी सौहार्द्यपूर्ण व्हावी अस जर आपणास वाटत असेल, तर आपण आपले इच्छापत्र किंवा बक्षिसपत्र वेळेवर आणि सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ठेवणे आवश्यक आहे असा सल्ला २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया आणि इच्छापत्र (विल) आणि बक्षीसपत्र (गिफ्ट डीड) विषयी माहिती या सामाजिक विषयातील तज्ञ, ॲड. विशाल लांजेकर यांनी दिला. 

ठाणे पुर्वतील शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व यांच्यातर्फे वरील विषयावर ॲड. लांजेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले होते. २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया समजावून सांगताना ॲड. लांजेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण कायद्यातील महत्त्वाच्या बदलांच विश्लेषण आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया उपस्थित श्रोत्यांना सोप्या शब्दात समजावून सांगितली. इच्छापत्र आणि बक्षीसपत्र विषयी माहिती देताना त्यांनी या दोन्ही विषयांचे वेगळेपण आणि ही दोन्ही पत्र प्रोसेस करताना कोणत्या आवश्यक कायदेशीर बाबींच पालन करणे महत्वाचे आहे. त्याला लागणारे रजिस्ट्रेशन प्रोसेस, चार्जेस, तसेच इच्छापत्र आणि बक्षीसपत्र हे कोणी? का? केव्हा? आणि कधी? करणे आवश्यक आहे. हे उदाहरणासहीत समजावून सांगितसे.

उपस्थित श्रोत्यांच्या या तीनही विषयांवरील विविध प्रश्नउत्तरांनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समारोप झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियीजनात मंडळाचे कार्याध्यक्ष गिरीश राजे, उपाध्यक्ष सुभाष परब, सचिव सुभाष करंगूटकर, खजिनदार अमित ताम्हनकर, ज्येष्ठ सभासद अक्षर पारसनीस, हेमंत प्रधान आणि प्रशांत मोहिले आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे