शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम मशिन बाबत संभ्रमावस्था दूर करण्यासाठी २७ डिसेंबर पासून जनजागृती मोहीम, जिल्हाधिकारी नार्वेकरांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 16:38 IST

ईव्हीएम मशिन संदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ३७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्दे१४ हजार ८६० कलर छायाचित्र तयारप्रत्येक वाहनाला बसविले जाणार जीपीएस यंत्रणा

ठाणे - मतदारांच्या मनातील इव्हीएम आणि व्ही व्ही पॅट संदर्भात असलेली शंका दूर करण्यासाठी तसेच या मशिन किती निर्दोश आहेत, हे दाखविण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून पुढील दोन महिने जिल्हाभरात याचा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.                    सोमवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २०१९ मध्ये लोकसभेची निवडणुक येऊ घातली आहे. त्यामुळेच हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ईव्हीएम मशिन आणि व्ही व्ही पॅट यापूर्वी २० डिसेंबरला तपासणी झालेली आहे. त्यानुसार आता पुढील टप्यात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी ३७ वाहने तैनात करण्यात आले असून त्या संदर्भातील परवानगी निवडणुक आयोगाकडून घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात चौक, गर्दीची ठिकाणे या भागात ही जनजागृती मोहीम घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येत्या २६ डिसेंबरला या मशिन बाहेर पडणार आहेत. या जनजागृतीचा मुख्य उद्देश मतदारांपर्यंत या मशिनबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत, त्यांना या मशिन बाबत खात्री व्हावी असल्याचेही त्यांनी सांगितले. तर मतदाराने मतदान केल्यानंतर त्याने कोणाला मत दिले आहे, याची स्लिप त्याला सात सेकंदापर्यंत पाहता येणार आहे, हे या नव्या मशिनचे उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. या कामी राजकीय पक्षांकडूनसुध्दा मदतीची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच या जनजागृतीची एक अजेंडासुध्दा तयार करण्यात आला असून ज्या भागात कार्यक्रम घेतला जाईल त्याची माहिती आधी त्या भागात दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे जिल्ह्यात ७७ हजार ४३६ कृष्ण धवल छायाचित्र होते, त्यातील १४ हजार ८६० छायाचित्र रंगीत करण्यात आले असून ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ही जनजागृती मोहीम यशस्वी संपन्न व्हावी यासाठी प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसविली असून, या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती होते अथवा नाही, याची माहिती या माध्यमातून घेतली जाणार आहे. तसेच प्रत्येक वाहन कुठे आहे याची माहितीसुध्दा या माध्यमातून मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcollectorजिल्हाधिकारी