शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

इंदिरानगर सर्वात बकाल वॉर्ड

By admin | Updated: September 29, 2015 01:16 IST

एकीकडे केडीएमसी महापौर-आयुक्त स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत असताना या शहरांमधील बकाल अवस्था कधी दूर होणार, आम्हाला मोकळा श्वास कधी घ्यायला मिळणार

अनिकेत घमंडी, डोंबिवलीएकीकडे केडीएमसी महापौर-आयुक्त स्मार्ट सिटीची स्वप्ने बघत असताना या शहरांमधील बकाल अवस्था कधी दूर होणार, आम्हाला मोकळा श्वास कधी घ्यायला मिळणार, असा सवाल इंदिरानगरमधील रहिवासी करीत आहेत. आधीच परिस्थितीने ग्रासलेले असतानाच महापालिकेनेही काणाडोळा केल्याने या ठिकाणी राहणे तर सोडाच, परंतु श्वास घेणेही अवघड झाले आहे. तशाच घुसमटीत हजारो रहिवासी वास्तव्यास आहेत. या ठिकाणी गेले की, आपण महापालिकेत आहोत की कोण्या पाड्यावर, अशी प्रचंड घाण अवस्था आहे. त्यातच नगरसेवक सत्ताधारी नाही, त्यामुळे केवळ गटारी, पायवाटा त्याही अर्धवट करण्यापलीकडे एकही विकासकाम झालेले नाही. समाजमंदिरातच महापालिकाही बालवाडीचे धडे विद्यार्थ्यांना देत आहे. उघडी गटारे, दरवाजातच कपडे धुणे, भांडी घासणे, अशा अवस्थेत येथील रहिवासी जीवन जगत आहेत. तुटपुंज्या नगरसेवक निधीतून जेवढे काम करता येईल, तेवढे करण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरसेवकाने केला. हजारोंच्या लोकसंख्येला या ठिकाणी केवळ दोन स्वच्छतागृहे आहेत. त्यांची अवस्था दयनीय असून त्या ठिकाणच्या नागरिकांमुळेच अशी बकाल अवस्था असल्याचे नगरसेवक व कार्यकर्ते सांगतात. लहान मुले तशा घाणीतच खेळत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेत कचराकुंडीमुक्त वॉर्ड करण्यासाठी नगरसेवकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्या स्पर्धेत येथील नगरसेवकाची गणतीच नाही, एवढा भयंकर कचऱ्याचा प्रश्न येथे आहे. महापालिकेतील स्लम एरिया ओळखला जाणारा हा वॉर्ड असून एकही विकासाची योजना येथे आलेली नाही. आघाडी सरकारच्या दोन्ही ठिकाणच्या सत्तेत त्यांच्या नगरसेवकांनी विशेष निधी आणून केडीएमसीत स्वत:चे वॉर्ड राखण्याचा प्रयत्न केला. येथील नगरसेवकाला मात्र तेही न जमल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागमोड्या आणि छोट्या गल्ल्यांमधून मार्ग काढताना एखाद्या नवख्या माणसाला भय वाटावे आणि त्यातच दुर्गंधी, गैरसोय बघून भोवळ यावी, अशी अवस्था आहे. बहुतांशी गटारांमध्ये पाणी तुंबलेले असून त्याच ठिकाणी रहिवासी कचरा, अन्न टाकतात. त्यामुळेही घाण, उग्र दर्प येत आहे. साधा रस्ता नाही. रंगीबेरंगी लाद्या-पेव्हरब्लॉक लावून पायवाटेला आकार देण्याचा प्रयत्न असून बहुतांशी ठिकाणी त्या ओबडधोबड झाल्याने वाट काढताना अडचण होते. बाजूचाच पेंडसेनगर वॉर्ड हा आयएसओ होण्याचे वेध लागले असतानाच या वॉर्डात नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या हाकेच्या अंतरावर एमआयडीसी आहे, परंतु तरीही बेरोजगारीची गंभीर समस्या आहे. शेकडो युवक असून त्यांच्या हाताला काम नसल्याने त्यांच्या भवितव्याचाही प्रश्न आहेच. सुशिक्षितांची डोंबिवली म्हणवताना हा भाग कसा काय वंचित राहिला, येथे विकासाची गंगा का वाहिली नाही. कोणत्याही खासदार, आमदारासह महापौर, उपमहापौर, आजी-माजी नगरसेवकांनी या ठिकाणी विकास योजना का आणल्या नाहीत? केवळ मतांसाठीच या रहिवाशांना गृहीत धरताना राजकारण्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार का केला नाही? केवळ स्लम म्हणून दुर्लक्षित का ठेवण्यात आले? आदी सवाल उपस्थित होत आहेत.