शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फ्रान्सच्या तुलनेत भारत व्यसनमुक्त होण्याचे प्रमाण 70 टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:30 IST

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात फार सुविधा नाहीत परंतु तरीही या केंद्रात आल्यावर 70 टक्के लोक पुन्हा व्यसनमुक्त होतात.

डोंबिवली- मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात फार सुविधा नाहीत परंतु तरीही या केंद्रात आल्यावर 70 टक्के लोक पुन्हा व्यसनमुक्त होतात. याउलट फ्रान्सचा अभ्यास केला असता तिथे आधुनिक सोयीसुविधा दिल्या जात असल्या तरी केवळ 3 टक्केच रूग्ण बरे होतात. भारतात कुटुंबियांकडून मिळणारा आधार यामुळे रूग्णाची बरी होण्याची शक्यता वाढते. हा सपोर्ट फ्रान्समध्ये रूग्णाला मिळत नाही, असे मत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. 

मनोदय ट्रस्ट व मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर यांच्या वर्धापन दिन व जागतिक व्यसनमुक्ती दिनानिमित्त एक पाऊल व्यसनमुक्तीकडे .. या कार्यक्रमांतर्गत डॉ. आनंद नाडकर्णी लिखीत मुक्तीपत्रे या पुस्तकाचे अभिवाचन व चर्चाचे आयोजन केले होते. यावेळी पुणतांबेकर बोलत होत्या. हा कार्यक्रम रविवारी ब्राह्मण सभेत पार पडला. मुक्तीपत्रे या पुस्तकाचे अभिवाचन प्रसिध्द अभिनेता सुयश टिळक आणि वेध अॅक्टींग अकादमीच्या मधुरा ओक यांनी केले. द्विज पुरस्काराने सन्मानित समाजसेवक मधुकर गिते यांनी ही प्रेक्षकांशी संवाद साधला. मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना पुणतांबेकर आणि मधुकर गिते यांनी उत्तरे दिली.

पुणतांबेकर म्हणाल्या, व्यसनधीन रू ग्ण हा उपचारापेक्षा कुटुंबियांच्या आधारामुळे अधिक सुधारतो. उपचार घेतल्यानंतर केंद्राशी संपर्कात राहणो गरजेचे असते. रूग्णाला टेन्शन येत असेल तर समुपदेशन केले जाते. एखादा उपचार घेतल्यावर दारूच्या पहिल्या ग्लासापासून दूर राहावे लागते. नाहीतर आजार पुन्हा उलटू शकतो. त्यासाठी रूग्णाला पथ्यांचे पालन करावे लागते. व्यसनधीनता हा कुटुंबाचा आजार आहे. त्यामुळे सगळ्य़ांना बदलण्याची गरज आहे. व्यसनाधीन व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबाला त्रस होतो. त्यांच्या व्यसनाधीनतेचा त्रस महिलेला अधिक होतो. त्यामुळे महिलांमध्ये अपराधीची भावना निर्माण होते. व्यसनधीन व्यक्ती रात्री व्यसन करून घरी येते तेव्हा कुटुंबियांनी नकारत्मक भावनेचा विचार करावा. त्या व्यक्तीला काहीही बोलू नये. ती व्यक्ती मुद्दाम भांडण काढण्याचा प्रयत्न करते. कारण त्या व्यक्तीला भांडण न केल्यास सकाळी अपराधीपणाची भावना निर्माण होते. चौकट-इंटरनेटचा सतत वापर हे देखील एक व्यसनच इंटरनेटचे व्यसन ही सध्या पाहायला मिळते. आपण गॅजेटवर अधिक अवलंबून राहू लागलो आहे. याला आयएडी म्हणजेच वर्तनात्मक व्यसन म्हटले जाते. या रूग्णासाठी मुक्तांगणमध्ये एक वेगळे विभाग तयार करावा लागला. एखाद्या गोष्टीचा दुरूपयोग आपण करीत नाही ना हे पाहिले पाहिजे. विवेक बुध्दीचा वापर केला पाहिजे. इंटरनेट, फोन दिवसातून एवढाच वेळ वापरला पाहिजे हे मनाशी पक्के केले पाहिजे. जेवताना टीव्ही बंद करून कुटुंबियांशी संवाद साधला गेला पाहिजे. मुलांना जेवताना ही मोबाईल हातात लागतो. या मुलांना पुन्हा चिऊ-काऊच्या गोष्टीकडे घेवून जाण्याची गरज आहे. पालकांनी मुलांना क्वालिटी टाईम दिला पाहिजे. जो वेळ मुलांना दयाल त्यात मग टीव्ही, मोबाईल नक ो. आपण कसे वागतो याकडे मुलांचे लक्ष असते. त्यामुळे स्वत:मध्ये बदल करा, असे ही पुणतांबेकर यांनी सांगितले.