शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

भारत-रशियातील व्यापार संबंध विस्तारणे गरजेचे!

By admin | Updated: November 15, 2016 04:13 IST

भारत आणि रशिया हे दोनही देश दीर्घकालीन मित्र असले तरी या दोन देशां दरम्यान व्यापार व उद्योग विषयक अल्पसंबंध लक्षात घेता या दोन्ही देशांमधील

पालघर : भारत आणि रशिया हे दोनही देश दीर्घकालीन मित्र असले तरी या दोन देशां दरम्यान व्यापार व उद्योग विषयक अल्पसंबंध लक्षात घेता या दोन्ही देशांमधील व्यापार विषयक संबंध विस्तारणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत आॅब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठ आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात व्यक्त केले.रशियातील बोल्शेविक क्रांतीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या पाशर््वभूमीवर रशिया आणि युरोशियन विभागातील देशांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मध्य युरोशिया अभ्यास केंद्र, मुंबई विद्यापीठ आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ व ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन सोमवारी फिरोजशहा मेहता भवन, मुंबई विद्यापीठ, सांताक्रुेझ येथे रशियन फेडरेशनचे कौन्सिल जनरल अँड्रे झलित्सोव, मुंबईतील रशियन सेंटरचे संचालक व्लादीमीर दीमेंटिव, आॅब्झर्वर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधींद्र कुलकर्णी, मेजर जनरल अनिलकुमार शुक्ला, युरोशियन अभ्यासकेंद्राचे प्रमुख डॉ. संजय देशपांडे आणि सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळींचे अध्यक्ष अँड. जी.डी.तिवारी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी चंद्रकांत दांडेकर, सचिव प्रा. अशोक ठाकूर आणि कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सहसचिव जयंत दांडेकर उपस्थित होते.समारोप अँड्. जी. डी. तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी ३.३० वा. झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अध्यक्ष अजय पटनाईक उपस्थित होते. त्यांनी राज्यव्यवस्था, व्यापार आणि आशिया खंडातील परिस्थिती यावर भाष्य करताना बदलत्या जागतिक परिस्थितीत निर्माण झालेल्या आव्हानांचा आढावा घेऊन मध्य आशियातील निर्वासितांच्या समस्यांवर भाष्य केले. या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये भारतासह रशिया, त्रिनिनाद, अझरबैजान, इराण, बेलारूस इ. अनेक देशातील विचारवंत व तज्ज्ञ सहभागी झाले होते. सूत्रसंचालन प्रा. महेश देशमुख यांनी केले. हा परिसंवाद यशस्वी करण्यासाठी प्रा. देशमुख, डॉ. किरण पाटील, प्रा. विवेक कुडू, डॉ. बी.बी.रहाणे, प्रा. रामदास येडे, डॉ. मनिष देशमुख यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)