शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तरीही कल्याण-डोंबिवली तहानलेलीच..!

By admin | Updated: December 14, 2015 01:09 IST

कल्याण पूर्वेचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. योजना पूर्ण झाल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

कल्याण पूर्वेचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. योजना पूर्ण झाल्यावर कल्याण पूर्वेला ६० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात त्याची पूर्तता केली जात नाही. पाणी कपातीच्या नावाखाली कल्याण पूर्वेला केवळ ३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. योजना तयार करताना महापालिकेने लोकसंख्येच्या आधारवर पाण्याचे नियोजन केलेले नव्हते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिकेत २७ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावांना औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा करते. ३० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा या गावांना केला जातो. ही गावे महापालिकेत नव्हती तेंव्हापासून गावांना पुरेसा पाणी पुरवठा केला जात नाही. आत्ता महापालिकेत समाविष्ट झाल्यावरही या गावांमध्ये पाण्याची समस्या आहे. ग्रामपंचायतींनी महामंडळाने दिलेल्या पाणी जोडण्यांवर महामंडळाची परवानगी न घेताच नव्या इमारती व चाळींना बेसुमार नळ जोडण्या दिल्या आहेत. त्यामुळे पाण्याची समस्या उद्भवली आहे. पाणी पुरवठ्याची योजना महापालिकेने हाती घेण्याऐवजी महामंडळाकडेच असावी, असा प्रस्ताव पाठविला आहे. शहर व ग्रामीण भागात पाण्याची चोरी भरमसाठ आहे. तसेच पाण्याची गळतीही जास्त आहे. महापालिका उल्हास नदीतून दररोज तीनशे दशलक्ष लिटर पाणी उचलते. त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करुन पाणी पुरवठा करते. लघुपाटबंधारे खात्याने ३० टक्के पाणी कपात लागू केल्याने शहर व ग्रामीण भागात आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद असतो. महापालिका हद्दीत पाण्याच्या गळतीचे प्रमाण २००८ नुसार २१ टक्के आहे. जागतिक निकषानुसार ते १५ टक्के असणे आवश्यक आहे. ही गळती रोखण्यासाठी महापालिकेने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. गळती रोखण्यासाठी सर्वेक्षणाचे टेंडर महापालिकेच्या पाणी खात्याकडून काढण्यात येणार आहे. महापालिकेने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली असली तर स्वत:चे धरण महापालिकेने घेतले नाही. महापालिका उल्हास नदीतून पाणी उचलते. त्या नदीत बारवी व आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. बारवी धरणावर महामंडळाची तर आंध्र धरणावर टाटा कंपनीची मालकी आहे. मोरबे धरण तयार होत असताना ते कल्याण-डोंबिवली महापालिकेने खरेदी करावे, असा प्रयत्न तत्कालीन भाजप नगरसेवक नंदू जोशी यांनी केले होेते. ते धरण नवी मुंबई महापालिकेने खरेदी केले. मोरबे धरण झाल्यावर ५९ दशलक्ष लिटर पाणी कल्याण डोंबिवली महापालिकेस देण्यात येईल. हा निर्णय २००८ साली होऊनदेखील त्याची अंमलबजावणी न झाल्याने ते पाणी आजही नवी मुंबईलाच पुरविले जात आहे. एप्रिल २०१५ साली पार पडलेल्या बैठकीत कल्याण-डोंबिवलीस मोरबे धरणाच्या बदल्यात पाणी देण्यास सरकारने नकार दिला आहे.