शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण, जिंदालविरोधात एल्गार

By admin | Updated: December 12, 2015 00:58 IST

केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी व स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चालविले असून वाढवण, जिंदाल बंदर, पर्ससीन मासेमारीला अभय देऊन मच्छीमार

पालघर : केंद्र व राज्य शासनाने विकासाच्या नावाखाली मच्छीमार, शेतकरी व स्थानिक जनतेला उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र चालविले असून वाढवण, जिंदाल बंदर, पर्ससीन मासेमारीला अभय देऊन मच्छीमार, शेतकरी, डायमेकर इ. देशोधडीला लागणार असल्याचा आरोप करीत अस्तित्वाच्या लढाईसाठी मुंबई ते थेट झाई पर्यंतच्या मच्छीमार, शेतकऱ्यांनी एकत्र येत शासनाविरोधात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता.रद्द करा, रद्द करा वाढवण, जिंदाल रद्द करा, समुद्र आमच्या कोळ्यांचा नाही कुणाच्या बापाचा, काटेंगे काटेंगे, मच्छी जैसे काटेंगे अशा उद्वेगपूर्ण घोषणा देत मच्छीमार महिलांचा मोठा सहभाग असलेल्या १५ ते २० हजार मच्छीमारांच्या मोर्च्याने आज पालघर शहराचा परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाजसंघ, पालघर, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी पालघर समाज संघाकडून मोर्चाला सुरूवात करण्यात आली. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस नरेंद्र पाटील, रामकृष्ण तांडेल, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनिषा निमकर, अनंत तरे, राजेंद्र मेहेर, किरण कोळी, अशोक नाईक, नारायण पाटील, अशोक अंभीरे, नारायण विंदे, ज्योती मेहेर, उज्वला पाटील, दामोदर तांडेल इ. मान्यवर उपस्थित होते.पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या डहाणू तालुक्यातील वाढवण येथे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन महाकाय बंदर बांधण्याची घोषणा करण्यात आली असून या बंदरामुळे मुंबई ते झाई पर्यंतचे मच्छीमार शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. १९९७ साली युतीच्या सरकारने बंदराची घोषणा केल्यानंतर स्थानिकांच्या उग्र आंदोलन व डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधीकरणाच्या आदेशानंतर युती सरकारने बंदर रद्द करण्याची घोषणा केली होती. परंतु पुन्हा ते सत्तेत आल्यानंतर वाढवण बंदर होणारच अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)