शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादाच्या लढाईत अडकले वाढीव पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 00:39 IST

महापौरांनी आदेश देऊनही प्रशासन ढिम्म : भाजप नगरसेवकाची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : घोडबंदर रोडसह ब्रह्मांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्याबाबत महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही घोडबंदर रोड परिसराला अद्याप वाढीव पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. या भागाला गेली दोन वर्षे पाणीटंचाईचे चटके बसत असून, शिवसेना व भाजपच्या श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडवरील रहिवाशांचे पाणी अडकल्याची चर्चा आहे. मात्र याबद्दल नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घोडबंदर रोड परिसरातील तीव्र पाणीटंचाईविरोधात भाजपचे स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सर्वप्रथम आवाज उठविला. त्यानंतर भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत ५ ऑक्टोबरला आयुक्तांच्या दालनात बैठकही झाली. त्यात घोडबंदरवासीयांसाठी वाढीव १० दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्याचे निर्देश आयुक्तांना दिले. मात्र, त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठक घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याचे निर्देश दिले. दुसऱ्या दिवशी शिवसेनेमुळेच एका बैठकीत पाणीप्रश्न सुटल्याचा दावा त्यांनी केला होता. महापौरांच्या या श्रेय घेण्याच्या प्रयत्नांस डुंबरे यांनी आक्षेप घेतला. गेली दोन वर्षे पाण्यासाठी संघर्ष सुरू असताना शिवसेना झोपली होती का, असा सवाल त्यांनी केला.

महापौरांच्या स्पष्ट निर्देशाला तीन आठवडे उलटल्यानंतरही, घोडबंदर रोडवरील पाणीटंचाई कायम आहे. सेना विभागप्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अलीकडेच महापौरांची भेट घेऊन पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यानंतर सोशल मीडियावर पाणीटंचाई लवकरच दूर होणार असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी सेनेचे स्थानिक पदाधिकारी श्रेय घेण्याकरिता सरसावले आहेत.

संतापाची भावना दोन वर्षांपासून घोडबंदर परिसरासह ब्रह्मांड भागाला पाणीटंचाईचा फटका बसत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून भाजप-शिवसेनेकडून वाढीव पाण्याचे दावे केले जात आहेत. श्रेयवादाच्या लढाईत घोडबंदर रोडचे पाणी अडकले त्याबाबत संताप व्यक्त होत आहे.