शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा टक्का वाढला?

By admin | Updated: February 23, 2017 06:04 IST

ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा प्रथमच मागील दोन निवडणुकांचा विक्रम मोडत ५९ टक्के

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत यंदा प्रथमच मागील दोन निवडणुकांचा विक्रम मोडत ५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील २०१२ च्या निवडणुकीत ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यंदा मात्र सहा टक्के वाढीव मतदान झाले आहे. त्यामुळे आता या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या महत्त्वाच्या भागांमध्ये भाजपाची आगेकूच झाली होती, त्याच प्रभागांमधून मतदानाचा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपाला होणार का, हे आता गुरुवारीच स्पष्ट होणार आहे. ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी झालेल्या मतदानात १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांपैकी ७ लाख २४ हजार ९०३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये ६ लाख ६७ हजार ५०४ पुरुष मतदारांपैकी ३ लाख ९५ हजार ९३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर, ५ लाख ६१ हजार ८७ महिला मतदारांपैकी ३ लाख २८ हजार ९६२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. ३३ प्रभागांमध्ये सर्वच ठिकाणी मतदानाचा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला दिसून आला आहे. दरम्यान, २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५६.५७ टक्के आणि २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५३.२५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. यापूर्वीच्या अनुभवानुसार मतदानाचा टक्का कमी असेल, तर त्याचा फायदा शिवसेनेला झालेला दिसून आला. २००७ आणि २०१२ मध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले होते. २०१२ मध्ये द्विपॅनल पद्धत होती. यंदा चार पॅनलचा एक वॉर्ड अशी रचना असल्याने या पद्धतीचा फायदा हा शिवसेनेलाच अधिक होईल, असा दावा केला जात आहे. परंतु, आता सहा टक्के वाढलेल्या मतदानामुळे त्याचा काही अंशी परिणाम शिवसेनेला सोसावा लागेल, असेही बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला घोडबंदर, ठाण्याचा मध्यवर्ती भाग आणि कोपरीच्या काही भागांतही मतदारांनी मतदानात आघाडी दिली होती. किंबहुना, वाढलेल्या या मतांवरच ठाण्याचा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून निसटला होता. आता याच भागांमध्ये मतदानाचा टक्का ५६ ते ६४ टक्क्यांवर गेला आहे. मागील निवडणुकीत याच भागात मतांचा टक्का ४८ ते ५५ आसपास होता. त्यामुळे आता या वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपाला होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. घोडबंदर भागातही प्रभाग क्रमांक १ मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ६१.६६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रह्मांड, अकबर कॅम्प या परिसरातील प्रभाग क्र. २ मध्येही सुशिक्षित मतदार हा मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले असून येथे ५४.६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा हे प्रमाण एक टक्क्याने जास्त असले तरीदेखील त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, प्रभाग क्र. ४ आणि ५ मध्येही मतदानाचा टक्का वाढला असून येथे अनुक्रमे ५४.८९ आणि ५९.७५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याशिवाय, प्रभाग क्रमांक ११ मधील मतदानाचा वाढलेला टक्का हा कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे महत्त्वाचे असून येथील लढत पूर्वीचा शिवसैनिक आताचा भाजपा आणि शिवसेना अशी झालेली आहे. त्यामुळे येथील मतदानाचा ६२.०८ टक्का हा कोणाला फायदेशीर ठरणार, हे समजणार आहे. याशिवाय, शहरातील मध्यवर्ती भागातील प्रभाग क्रमांक २१, २२ मध्येही मतदानाचा टक्का अनुक्रमे ६४.६७ आणि ६४.९० टक्के एवढा झाला आहे. तर, कोपरीतील प्रभाग क्रमांक १९ आणि २० प्रभागांत मतदानाची टक्केवारी ही ६० च्या वर गेली आहे. ही टक्केवारी शिवसेनेचे नरेश म्हस्के, विकास रेपाळे, गिरीश राजे, मालती पाटील, भाजपाचे भरत चव्हाण, किरण टिकमानी यांचे भवितव्य निश्चित करणारे आहे. याशिवाय, इतर प्रभागांतही कमीअधिक प्रमाणात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. खासकरून वागळे, किसननगर पट्ट्यातही मतदारांनी सर्वाधिक मतदान केले असून हा भाग शिवसेनेचा म्हणजेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असून याच पट्ट्यातूनही अधिक मतदानाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)प्रभाग क्र.एकूण मतदानटक्केवारी१)१८१०२६१.६६२)१९३८६५४.६१३)२२५४६५६.५२४)१८२०१५४.८९५)२२०४७५९.७५६)२८८३०६२.७८७)२५८०८५७.०४८)२६१६६५६.२७९)२३१७८६५.१९१०)१९३८३६१.१९११)२३९७९६२.०८१२)२५२६७६७.२५१३)२६०५९६२.१५१४)२५६७१५९.९९१५)२८६३७५६.४११६)२३९५९५५.६३१७)२५१४०५४.९११८)२४४४०५६.२०१९)२२५४६६०.५४२०)२८७२०६१.५०२१)२४८९७६४.६७२२)२७६५०६४.९०२३)२७७७७६३.२४२४)२३७८८६१.७६२५)१८८८४५६.१६२६)१९२४७५२.८५२७)१७०८०६४.३०२८)१६१९१६६.५०२९)१४२७७६७.०४३०)१३९९३४३.०८३१)१७२९७५३.५३३२)१३९३०४९.०८३३)११८२७५३.८३एकूण७२४९०३५९.००सर्वाधिक मतदानाची नोंद प्रभाग क्रमांक १२ मध्ये 67.25%एवढी झाली आहे. सर्वात कमी मतदानाची नोंद प्रभाग क्रमांक ३० मध्ये झाली असून येथे 43.08% मतदानाची नोंद झाली आहे. कळव्यात अनुक्रमे ५६ ते ६१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे एकमेव आमदार संजय केळकर यांना घोडबंदर पट्ट्यासह ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणाहून अधिकचे मते मिळाली होती. किंबहुना, अधिकचा टक्का या पट्ट्यातून मिळाला होता. आता तर याच पट्ट्यामध्ये मतदानाचा टक्का हा  56-67% टक्क्यांपर्यंत आला आहे. त्यामुळे याचा फायदा भाजपाला होणार की शिवसेनेला, किंबहुना वाढलेली मते कोणाची, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदानाची टक्केवारी एकूण झालेल्या59% मतदानामध्ये सर्वाधिक मतदानाचा टक्का हा प्रभाग क्रमांक १३ मध्ये वाढल्याचे दिसून आले असून येथे तब्बल 67.25% मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीपासूनच हा वॉर्ड चर्चेत असून या प्रभागात भाजपाचे नारायण पवार यांची लढत ही थेट खासदार राजन विचारे यांच्या उमेदवारांशी आहे. परंतु, आता या प्रभागात मतदानाचा टक्का वाढल्याने त्याचा फायदा भाजपाला अधिक होईल, असा कयास लावला जात आहे. तर, या प्रभागाच्या खालोखाल 67.04% मतदानाची नोंद ही प्रभाग क्र. २९ मध्ये झाली असून या ठिकाणी राष्ट्रवादीचे हिरा पाटील यांच्या पत्नीचे आणि शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. दुसरीकडे दिव्याकडेही सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.