शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार कोटींचा वाढीव भार ठामपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:09 IST

ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपुलांची गरज नसतानाही तीन ते चार वर्षांपासून तीन उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. यातील एक ...

ठाणे : शहराच्या मध्यवर्ती भागात उड्डाणपुलांची गरज नसतानाही तीन ते चार वर्षांपासून तीन उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. यातील एक पूल पूर्ण झाला असून तो अनौपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुला केला आहे. परंतु, उर्वरित दोन पुलांची कामे आजही अर्धवट स्थितीत आहेत. त्यात ठेकेदारांकडून पुलांच्या कामांत दिरंगाई होत असताना त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करण्याऐवजी या पुलांच्या वाढीव खर्चाचा चार कोटी ३७ लाखांचा प्रस्ताव पटलावर आहे.

या प्रस्तावानुसार मुंबई प्रदेश विकास महानगर प्राधिकरणामार्फत पूल प्रकल्पाच्या खर्चामध्ये भविष्यात वाढ झाली, तर तो खर्च महापालिकेच्या निधीतून करण्याची अट घातली होती. या अटीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीमुळे उड्डाणपुलांच्या वाढीव खर्चाचा भार पालिकेच्या खांद्यावर आला आहे.शहरात तीन ठिकाणी एमएमआरडीएच्या माध्यमातून उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. मीनाताई ठाकरे चौक, तीनपेट्रोलपंप आणि नौपाडा या तीन ठिकाणी उड्डाणपुलांसाठी २२३ कोटी ६९ लाख ६१ हजार रु पये इतका निधी खर्च करण्यात येत आहे. एमएमआरडीए तो करत असून या कामाचे तांत्रिक पर्यवेक्षण महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. तीनपेट्रोलपंप भागातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी अनौपचारिकरीत्या खुला केला. तर, मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा येथील पुलांची कामे सुरू आहेत. १८ महिन्यांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, दिलेल्या मुदतीत ती पूर्ण झाली नसल्याने त्याचा फटका ठामपाला बसणार आहे.

सल्लागाराच्या खर्चातही वाढ

दुसरीकडे या पुलांच्या कामांसाठी नेमण्यात आलेल्या सल्लागाराच्या खर्चातही वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. महावितरण, पाणीपुरवठा, मलनि:सारण आणि एमटीएनएल या विभागांच्या सेवावाहिन्या स्थलांतरित करणे, मीनाताई ठाकरे चौकातील पुलाच्या खांबांमध्ये केलेले बदल तसेच या पुलाच्या कामांसाठी वाहतूक पोलिसांची परवानगी, यामुळे पुलांची कामे मुदतीत झालेली नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. तसेच मुदतीत कामे झालेली नसल्याने या पुलांच्या कामासाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराची मुदत वाढवावी लागणार असून त्यासाठी एक कोटी १० लाखांचा वाढीव खर्च करावा लागणार आहे.

टॅग्स :tmcठाणे महापालिका