शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ; आतापर्यंत न्यूज नेटवर्क ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 20:29 IST

ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात एक हजार ९६.२० मिमी. पाऊस पडला. जिल्हा प्रशासनाने या पावसाची सरासरी १५६.६० मिमी. नोंद घेतली. आतापर्यंत ५११.८२ मिमी . पाउस झाला असून ठाण्यात सरासरीच्या ८३.५५ टक्के, कल्याणमध्ये ७७.१६ टक्के, मुरबाडमध्ये ५९.१८ टक्के, उल्हासनगरमध्ये ७८.१२ टक्के, अंबरनाथमध्ये ७२ टक्के. भिवंडीमध्ये ८५.८४ टक्के आणि शहापूरमध्ये ५६.०२ टक्के पाउस झाला आहे.

ठळक मुद्दे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढलामोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आलेकल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी

ठाणे : जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस मागील काही दिवसांपासून धरण क्षेत्रात ही पडत आहे. यामुळे धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. रात्रभर पडलेल्या पावसामुळे धरणांमध्ये सुमारे ६ ते १२ टक्के पाणी साठा वाढला. मोडकसागर १०० टक्के भरल्यामुळे त्यांचे दोन दरवाजे उघडण्यात आले. तानसाही भरण्याच्या स्थितीत आहे. ९१.५५ टक्के पाणीसाठा तयार झाला. रात्रभरात तो भरण्याची शक्यता आहे. जिल्ह्याभरात आतापर्यंत ७३.१३ टक्के पाऊस पडला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणाी साठा वाढला असल्याचे आढळून आले आहे.भातसामध्ये रविवारी केवळ ५८ टक्के पाणी साठाहोता. तो ओज ६४ टक्के आहे. रात्रभरात ६ टक्के पाणी साठा सर्वाधिक मोठ्या असलेल्या भातसा धरणात वाढला आहे. या प्रमाणेच तानसामध्ये ९२ टक्के साठा असून रात्रभरात तो १२ टक्केने वाढला. या धरणात आज ९९ मिमी पाऊस पडला आहे. बारवी धरणातही १२ टक्के पाणी साठा वाढून तो ८२.१९ टक्के झाला. बारवीची पाण्याची पातळी सध्या ६६.४४ मीटर आहे. हे धरण भरण्यासाठी केवळ दीड मीटर पातळी बाकी आहे. रात्रभर पाऊस सुरू राहिल्यास बारवी भरण्याची शक्यता आहे. बारवी आत २०२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी या धरणात ९५ टक्के पाणी साठा होता.उल्हासनदीला पाणी पुरवठा करणार आंध्रा धरणाची सध्या १६०.९० मीटर पातळी आहे. ४७.४४ टक्के पाणी साठा असलेल्या आंध्रामध्ये देखील रात्रभरात ४ टक्के पाणी साठा वाढला आहे. या धरणात आज ८० मिमी पाऊस पडला. तानसा धरण येत्या दोन दिवसांत भरून वाहू लागेल अशी परिस्थिती आहे. भातसामध्ये ७८ टक्के साठा झाल्यावर दरवाजे उघडण्याची प्रक्रि या होईल. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७३.१३ टक्के पाऊस झाला असून धरणांमध्ये देखील ७३.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित यंत्रांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सांगितले.उल्हास नदीला पूर आलेला आहे. यामुळे कल्याण - अहमदनगर रस्त्यावरील रायता पूलावरून पाणी वाहत आहे. कल्याणच्या बाजूकडे पाण्याची पातळी वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. कल्याण - शिळ महामार्गावरील टाटा पॉवर येथील रस्ता देखील पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली. या महामार्गावरील वाहतूक गोवेली,टिटवाळा, आंबिवली आणि शहाड मार्गाने वळविली आहे. आणे व भिसोळ पुलावरून पाणी वाहात असल्याने तेथील वाहतूक देखील बंद करावी लागली. संततधार पावसामुळे धरणाचा पाणी साठा वाढत आहे. याच प्रमाणे बदलापूर बंधारा देखील धोक्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. या बंधाऱ्याची धोका पातळी १७ मीटर असून असून आजची पातळी १६.८० मीटर झाली आहे. याप्रमाणेच मोहने बंधाºयाची धोका पातळी दहा मीटर असून आजची पातळी १०.१० मीटर झाली आहे. या बंधाºयाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ं* *