डोंबिवली : रेल्वे प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण स्थानकात ही सुविधा मंगळवारपासून उपलब्ध झाली आहे. या जनजल योजनेचा शुभारंभ डॉ. शिंदे यांच्या हस्ते प्लॉटफॉर्म क्र . चार-पाच येथे झाला. या योजनेमुळे प्रवाशांना पाच रु पयांत एक लिटर तर २० रुपयांत पाच लिटर पाणी मिळेल.आयआरसीटीसीने बसवलेल्या वॉटर वेंडिंग मशीनचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, महानगरप्रमुख विजय साळवी, अरविंद मोरे, विजया पोटे आदी उपस्थित होते. वॉटर वेंडिंग मशीनमुळे प्रवाशांना २४ तास स्वच्छ पाणी मिळेल. या स्थानकात उपनगरी प्रवासी तसेच बाहेरगावच्या गाड्यांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांना अत्यल्प दारात स्वच्छ पाणी मिळणे आवश्यक होते. या वॉटर वेंडिंग मशीनमुळे प्रवाशांची मोठी अडचण दूर होणार आहे. डोंबिवली स्थानकातही हे मशीन बसवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
वॉटर वेंडिंग मशीनचे उद्घाटन
By admin | Updated: April 26, 2017 00:17 IST