शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सात एलईडी बसथांब्यांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

मुंब्रा : येथील रेतीबंदर सर्कल ते कल्याण फाटादरम्यानच्या रस्ता रुंदीकरणादरम्यान तोडण्यात आलेल्या ३८ पैकी सात एलईडी बसथांब्यांची परिवहन समितीचे ...

मुंब्रा : येथील रेतीबंदर सर्कल ते कल्याण फाटादरम्यानच्या रस्ता रुंदीकरणादरम्यान तोडण्यात आलेल्या ३८ पैकी सात एलईडी बसथांब्यांची परिवहन समितीचे सदस्य शमीम खान यांच्या प्रयत्नामुळे पुनर्बांधणी करण्यात आली आहे. त्यांचे उद्‌घाटन शुक्रवारी रात्री गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

ऊन, पावसात बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना या थांब्यांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी आव्हाड यांनी खान हे त्यांना मिळालेल्या पदाचा योग्य वापर करून करीत असलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांची प्रशंसा केली. तसेच नुकताच येथून मुंबई सीएसटीदरम्यान सुरू केलेल्या बसचा प्रवास जलद व्हावा, यासाठी ही सेवा बायपासमार्गे चालवण्याचा सल्ला दिला. रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण होताच उर्वरित ३१ बसथांब्यांचीही पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ (शानू) पठाण यांनी दिली. यावेळी नगरसेविका सुनीता सातपुते, वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या संगीता पालेकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पल्लवी जगताप आदी उपस्थित होते.