शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण

By अजित मांडके | Updated: June 17, 2023 14:04 IST

 ठाणे महापालिकेने घेतल्या दोन गाड्या, आणखी चार गाड्या लवकरच सेवेत दाखल होणार

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील मोठे रस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी सकाळी झाले. 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रात रस्ते, शौचालये, स्वच्छता आणि सुशोभीकरण यांची कामे सुरू आहेत. याच मोहिमेत, ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी सहा सफाई यंत्रे घेण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सफाई यंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त तुषार पवार उपस्थित होते. ठाणे शहरातील मुख्य रस्ते तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्त्यांची सफाई या यंत्रांद्वारे करण्यात येणार आहे. शनिवार सकाळपासून या गाड्यांच्या माध्यमातून पूर्व द्रुतगती महामार्ग, वागळे इस्टेट या परिसरात सफाई सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत, अशी यंत्रे बसवलेल्या दोन गाड्या महापालिकेकडे आल्या आहेत. एक गाडी दिवसभरात सुमारे ४० किमी रस्त्यांची सफाई करू शकेल. ही यंत्रे असलेल्या आणखी चार गाड्या उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या लवकरच ठाणेकरांच्या सेवेत दाखल होतील. या गाड्यामुळे शहरातील मोठ्या रस्त्यांची सफाई जलदगतीने होण्यास मदत होईल. रस्त्यावरील कचरा, रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर साठणारी  धूळ काढण्याचे काम या गाड्या करतील. त्याचबरोबर शहरातील छोट्या गल्ल्यांमध्ये साफसफाई व्हावी, या दृष्टीने लहान इलेक्ट्रीकल गाडी आणण्याचाही विचार असल्याची माहिती त्यांनी दिली.  यांत्रिक पद्धतीने केली जाणारी सफाई ही मनुष्यबळाचा वापर करून होत असलेल्या सफाईला पर्याय ठरू शकत नाही. परंतु, यांत्रिक पद्धतीने सफाई सुरू केल्यामुळे त्या ठिकाणचे मनुष्यबळ इतर रस्त्यांवरील सफाईसाठी वापरणे शक्य होईल. जेणेकरून मनुष्यबळाद्वारे केल्या जाणाऱ्या सफाईची कार्यक्षमता वाढवता येईल,असे ते म्हणाले. यांत्रिक पद्धतीने सफाईमध्ये मशीनची देखभाल आणि दुरूस्ती हा कळीचा मुद्दा असतो. मशीन नवीन असताना जी कार्यक्षमता असते ती मशीन जुनी व्हायला लागल्यावर कमी होणे अपेक्षित नाही. त्यामुळे, संपूर्ण कालावधीत सफाईची कार्यक्षमता समान राहील, देखभाल आणि दुरुस्ती  अत्युच्च दर्जाची राहील, याच्या सूचना कंत्राटदारास देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यांत्रिक सफाईमुळे रस्त्यावरील कचरा उचलण्यास मदत होईल. तसेच, रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला असलेली  धूळ साफ करण्यास मोठी मदत होईल. महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, कॉंक्रिटचे रस्ते यांची सफाई या पद्धतीने करण्याचे महापालिकेचे नियोजन असल्याचे बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे