शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर रेल्वे स्थानकात नवीन सरकते जिने व स्वच्छता गृहाचे लोकार्पण

By धीरज परब | Updated: May 27, 2023 14:40 IST

सरकत्या जिन्यामुळे बालाजी नगर दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना जिने चढावे लागणार नाहीत

मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ व २ वरील सरकता जिना आणि स्वच्छता गृहाचे लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री करण्यात आले. 

भाईंदर रेल्वे स्थानकाचा विकास व प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खा . राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासना कडे पाठपुरावा चालवला आहे. आता पर्यंत रेल्वे स्थानकात अनेक ५ सरकते जिने . लिफ्ट , पादचारी पूल, स्वच्छतागृह आदी सुविधा प्रवाश्याना उपलब्ध झाल्या आहेत. 

शुक्रवारी रात्री खा . विचारे यांच्या हस्ते फलाट क्रमांक १ व २ वर बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाचे तसेच बालाजी दक्षिण दिशेला बांधलेल्या नवीन पुलावर जाण्यासाठी सरकते जिन्याचे लोकार्पण करण्यात आले . यावेळी  पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राजेश शर्मा, अनिलकुमार गुप्ता, प्रदीप शर्मा, स्टेशन अधीक्षक भारती राजवीर , माजी नगरसेवक नीलम ढवण , रोहिदास पाटील , प्रवीण पाटील , ओमप्रकाश गाडोदिया ,  लक्ष्मण जंगम, जॉर्जी गोविंद, स्नेहल सावंत , पवन घरत , आकांक्षा वीरकर ,  धनेश पाटील, जयराम मेसे,  जितेंद्र पाठक, चंद्रकांत मुद्रस आदींसह कार्यकर्ते , प्रवाशी उपस्थित होते . 

सरकत्या जिन्यामुळे बालाजी नगर दिशेला उतरणाऱ्या प्रवाशांना जिने चढावे लागणार नाहीत. वृद्ध , महिला , रुग्ण आदींना दिलासा मिळाला आहे.  शिवाय स्वच्छता गृह सुरु झाल्याने देखील प्रवाश्याना दिलासा मिळणार असून स्थानक बाहेर सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे बंद होण्याची अपेक्षा आहे. बोरीवलीच्या धर्तीवर मीरारोड व भाईंदर रेल्वे स्थानकाची डेक लेव्हल वर फलाटाची निर्मिती होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मीरारोड  स्थानकाचे काम सुरु झाले आहे असे खा. विचारे यांनी सांगितले . यावेळी महापालिके मार्फत सुरु भाईंदर पश्चिम येथील सुशोभिकरणाच्या कामाची तसेच प्रवाश्यां साठी तयार केलेल्या जिन्यांची पाहणी करण्यात आली .  या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण येत्या पंधरा दिवसात महापालिकेमार्फत होणार असल्याचे सांगण्यात आले.