शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनाचे उद्घाटन, आजपासून सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 14:24 IST

ठाण्यात आजपासून अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनास सुरुवात झाली आहे. देश विदेशातील व्यंगचित्रकार यात सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्दे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते उद्धाटनजयंत सावरकर,विवेक मेहेत्रे, प्रभाकर झळके, चारुहास पंडीत, राजेश मोरे उपस्थितभरगच्च कार्यक्रमांचा समावेश

ठाणे : कार्टूनिस्ट कंबाईन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनाचे शनिवारी सकाळी पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते व ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या उपस्थितीत उद्धाटन झाले. यावेळी अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, चारुहास पंडीत, परिवहन समिती सदस्य राजेश मोरे आदी उपस्थित होते.      शनिवार 20 आणि रविवार 21 जानेवारी असे दोन दिवस रंगणा:या संमेलनास आजपासून सुरूवात झाली. यात व्यंगचित्रकारांच्या ओळखी, भेटी व परिचय असा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. यात परिसंवाद, मनोरंजनात्मक कार्यक्रम, भव्य प्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे. ज्ञानदेव सभागृह व कचराळी तलाव या दोन ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केले आहे. आज दुपारी 2 ते 4.30. यावेळेत ज्ञानराज सभागृह, पाचपाखाडी येथे महिलांसाठी व्यंगचित्र कार्यशाळा होणार असून यात वैजनाथ दुलंगे व राधा गावडे मार्गदर्शन करणार आहेत. सायं. 4.30 ते 7.15 यावेळेत कचराळी तलाव येथे व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके हा कार्यक्रम होणार असून यात अरविंद गाडेकर, सुरेश क्षीरसागर, वैजनाथ दुलंगे, विवेक प्रभूकेळुस्कर, संजय मोरे, उमेश चारोळे, भटू बगाले, विनय चणोकर यांचा सहभाग आहे. सायं. 7.30 ते 8.30 येथे सोशल मीडिया व व्यंगचित्रे या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्ञानराज सभागृह येथे रात्री 9.45 ते 10.30 यावेळेत निमंत्रितांसाठी मनोरंजनाचा तुफान विनोदी कार्यक्रम होणार आहे. देश-विदेशातील सुमारे 73 व्यंगचित्रकार यांचा संमेलनात प्रत्यक्ष सहभाग आहे. या संमेलनाच्या निमित्ताने जवळपास 550 व्यंगचित्र प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची अप्रकाशित सामाजिक चित्र रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत ज्ञानराज सभागृहामध्ये सुरू असेल. आज सायंकाळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, ठाणो जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आ. संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे आदी संमेलनात सहभागी होणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली. रविवारी मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक