शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

लोकसंख्येच्या घनतेपुढे शहरांतील पायाभूत सुविधा पडताहेत अपुऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 10:46 IST

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेशातील सर्वाधिक शहरे आहेत.

ठळक मुद्देमुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेशातील सर्वाधिक शहरे आहेत.

नारायण जाधव

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेशातील सर्वाधिक शहरे आहेत. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने येथील महानगरांतील प्रदूषण,  पाणीपुरवठा यासह इतर मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधींची अनुदाने देऊ केली आहेत. मात्र, लोकसंख्येच्या वाढत्या घनतेपुढे महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमध्ये वॉटर, मीटर, गटरच नव्हे सर्वच सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सार्वजनिक बससेवा, लोकल सेवेसह आता मेट्रो १२ मार्गही आकार घेत आहेत. मात्र, तरीही वाढते उद्योग, आयटी पार्क, व्यापार-उदीमामुळे प्रवाशांची गैरसोय कमी झालेली नाही.

राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघु उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराची घनता २०११च्या जनगणणेनुसार मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजाराहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून अधिक आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरस किलोमीटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख सहा हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरार नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येच्या वृद्धीचा स्थिर असला तरी २००१-२०११च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखांहून कमी झालेली आहे. ती नजीकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशांतील ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रांतील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर इतर सात महापालिकांचा वाटा ३२.०७ टक्के आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महानगरपालिका दहा लाखांहून लोकसंख्येच्या होत्या. इतर तीन महापालिकाही दहा लाखांच्या होतील, असा अंदाज होता, आता २०२१ मध्ये  तो खरा झालेला असेल.

वाढत्या लोकसंख्येपुढे पाणीटंचाईचे संकटमहानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०२१ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली असून आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, त्याचा विचार न करता महाविकास आघाडी सरकारने क्लस्टर आणि एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या नावाखाली चटईक्षेत्रात खैरात वाटून भविष्यातील संकटात आणखी भर घातली आहे.

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र