शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वॉशिंग्टनमध्ये डॉ. बेडेकरांनी पूर्ण केली १३ वी फुल्ल मॅरेथॉन, एकमेव भारतीय स्पर्धेत सहभागी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 19, 2022 17:51 IST

ठाणे : वॉशिंग्टन येथील नॉर्थ बँड या शहरात घेण्यात येणाऱ्या लाईट ऑफ द टनल मॅरेथॉन या स्पर्धेत भारतातून डॉ. ...

ठाणे : वॉशिंग्टन येथील नॉर्थ बँड या शहरात घेण्यात येणाऱ्या लाईट ऑफ द टनल मॅरेथॉन या स्पर्धेत भारतातून डॉ. महेश बेडेकर हे एकमेव स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत डॉ. बेडेकर यांनी ३ तास १६ मिनिटांत ४२.२ किमीची फुल्ल मॅरेथॉन पूर्ण केली. जगातील सहा मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर निसर्गात धावण्याचा एक वेगळा अनुभव घेता आला असे डॉ. बेडेकर यांनी सांगितले. 

नॉर्थ बँड या परिसरात राहणाऱ्या एका अमेरिकन महिलेने ही स्पर्धा वैयक्तीक स्तरावर आयोजित केली होती. २०१४ पासून ते अशा मॅरेथॉनचे आयोजन करीत आहेत. या स्पर्धेत ५०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात डॉ. बेडेकर हे एकमेव भारतीय स्पर्धक होते. बर्लिन, न्यूयॉर्क, लंडन, टोकियो, शिकागो आणि शेवटची बोस्टन या मोठ्या मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर ते न्यू बँड येथील स्पर्धेत सहभागी झाले. यावेळेस पण अचूक वेळ जुळून आल्याचे डॉ. बेडेकर म्हणाले. लाईट ऑफ द टनल मॅरेथॉनमध्ये बोगद्यातून धावण्याचा अनुभव आला. आधीच्या स्पर्धांमध्ये ३० ते ४० हजार स्पर्धक धावत होते. इथे ५०० स्पर्धक असल्याने कित्येक किलोमीटर मी एकटाच होतो. परंतु स्पर्धक नसले तरी निसर्ग मात्र सोबत होता अशा भावना डॉ. बेडेकर यांनी व्यक्त केल्या.

या स्पर्धेसाठी त्यांनी २०१९ मध्येच नेंदणी केली होती. परंतु त्यानंतर आलेला कोरोनाचा काळ यामुळे या स्पर्धेत भाग घेता आले नाही. परंतू यंदा त्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन १३ वी फुल्ल मॅरेथॉन डॉ. बेडेकर यांनी पूर्ण केली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांसाठी त्या अमेरिकन ज्येष्ठ महिला नागरिकाने घरातून सूप बनवून आणले होते. त्यामुळे एक भावनिक नाते निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे