शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात भुयारी गटात कामावेळी जलवाहिनी फुटली; अनेक घरात पाणी, नागरिक संतप्त

By सदानंद नाईक | Updated: March 22, 2024 18:06 IST

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली.

उल्हासनगर : शहरातील कुर्ला कॅम्प परिसरात भुयारी गटार पाईप टाकण्याच्या वेळी पाण्याची जलवाहिनी फुटल्याने, काही नागरिकांच्या घरी पाणी घुसले. यांप्रकाराने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी काँग्रेस शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली.

 उल्हासनगरात भुयारी गटार पाईप टाकण्याचे काम सुरू असून त्यामध्ये अनियमितता असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळा जलकुंभ परिसरात रस्ता खोदून गटारीचे पाईप टाकण्याचे काम बुधवारी रात्री सुरू होते. त्यावेळी खोदकाम सुरू असताना जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी खाली गेले. तसेच शेजारील काहीं घरात पाणी घुसल्याने, नागरिकांनी नाराजी व्यक्त करून कारवाईची मागणी केली. स्थानिक नगरसेविका अंजली साळवे यांनी शहरातील भुयारी गटारी खोदताना कोणतीही सुरक्षा न घेता रस्ते खोदत जात असल्याने, नागरिकांची गैरसोय होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली. तर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी भुयारी गटार योजनेबाबत नागरिकांत असंतोष निर्माण झाला असून रस्ते धुळीने माखल्याने, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले.

 महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे यांनी पथकासह जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी युद्धपातळीवर दुरुस्ती केली. मात्र दोन दिवस पाणी बंद राहिल्याने, नागरिकांचे हाल झाले. भुयारी गटार खोदताना अनेक वेळा जलवाहिन्या तुटण्यात आल्या असून गटारीचे काम अटीशर्तीचें उल्लंघन करून होत असल्याची टीका शहरातून होत आहे. भुयारी गटारीचे २९ टक्के पेक्षा जास्त काम झाल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख बुडगे यांनी करून ठेकेदाराला १५ कोटी पेक्षा जास्त निधी दिल्याची माहिती दिली. 

खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती नाही शहरातील रस्ते खोदून भुयारी गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्त्याची दुरुस्ती केली जात नसल्याने, शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्याची परिस्थिती निर्माण झाली.

 *ठेकेदाराला विचारला जाब...आयुक्त अजीज शेख शहरात रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकण्यात येत असून रस्ते खोदतांना पाण्याच्या जलवाहिनी तुटल्या जात आहे. ठेकेदाराकडून झालेली नुकसान भरपाई केली जात असून त्यांना तसे आदेश दिले आहे.