शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! मृत घोषित केलेला रुग्ण अचानक झाला जिवंत; घरचे करत होते अंत्यविधीची तयारी

By सदानंद नाईक | Updated: June 14, 2025 16:38 IST

अंत्यविधीची तयारी असताना मृत व्यक्ती झाला उभा, रुग्णालयात नेताच ठणठणीत, जेवणही केले 

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-४, शिवनेरी रुग्णालयाचे डॉ प्रभू आहुजा यांनी एका बेशुद्ध रुग्णाला रुग्णालया बाहेर रिक्षात तपासून मृत घोषित केल्याचा प्रकार उघड झाला. नातेवाईकानी रुग्णाला घरी नेऊन अंत्यविधीची तयारी सुरु केली असता, मृत व्यक्तीने हालचाल केली. जिवंत झालेल्या व्यक्तीला क्रिटीकेअर रुग्णालयात नेवून उपचार केल्यावर ते ठणठणीत बरे होऊन जेवणही केले. याप्रकाराने खाजगी रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात राहणारे वृद्ध अभिमान तायडे यांच्यावर जे जे रुग्णालयात कॅन्सरचे उपचार सुरु होते. त्यांना १५ दिवसापूर्वी घरी आणण्यात आले होते. शनिवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यावर नातेवाईकांनी त्यांना रिक्षात बेशुद्ध अवस्थेत उपचार करण्यासाठी शिवनेरी रुग्णालयात नेले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ प्रभू आहुजा यांनी सकाळी साडे आठ वाजता रुग्णालया बाहेरील रिक्षात बेशुद्ध अभिमान तायडे यांची तपासणी करून, त्यांना मृत घोषित केले. तसेच मृत्यू प्रमाणपत्र दिल्याचा आरोप नातेवाईकांचा केला. मृत घोषित केलेल्या अभिमान तायडे यांना घरी आणल्यावर त्यांच्यावर अंत्यविधी करण्याची तयारी नातेवाईकानी सुरु केली. यावेळी मृत तायडे यांची हालचाल झाली. त्यांना पुढील उपचार करण्यासाठी कॅम्प नं-३ येथील क्रीटीकेअर रुग्णालयात हलविले. 

क्रिटीकेअर रुग्णालयात अभिमान तायडे यांच्यावर उपचार सुरु झाल्यावर, त्यांना काही वेळात बरे वाटून नातेवाईका सोबत जेवण केले. नातेवाईकांनी शिवनेरी रुग्णालयाच्या डॉक्टर व कारभारा बाबत नाराजी व्यक्त केली. याप्रकाराने खाजगी रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून कारवाईची मागणी होत आहे. शिवनेरी रुग्णालय जूने व विश्वासू असून बहुतांश राजकीय नेते मंडळी व त्यांचे कुटुंब याच ठिकाणी उपचार घेतात. असे बोलले जाते.

शिवनेरी रुग्णालयात वृद्ध अभिमान तायडे यांना बेशुद्ध अवस्थेत रिक्षाने सकाळी साडे वाजता आणले होते. रिक्षात त्यांची तपासणी करून, त्यांना व्हेन्टेलेटर असलेल्या रुग्णालयात त्वरित नेण्याचे नातेवाईकांना सुचविले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकानी रुग्णालयात येऊन अभिमान तायडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र मागितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून अभिमान तायडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र दिले. ही माझी मोठी चूक आहे. मृत्यू प्रमाणपत्र दिल्यावर नातेवाईकानी बेशुद्ध रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात उपचार दरम्यान ठणठणीत असल्याचे सांगितले.  - डॉ प्रभू आहुजा - शिवनेरी रुग्णालय प्रमुख