शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अडीच दिवसात ७ हजार ५५० किलो निर्माल्य आणि २३५० किलो प्लास्टिक झाले जमा

By अनिकेत घमंडी | Updated: September 2, 2022 19:49 IST

पर्यावरण दक्षता मंडळासह अन्य संस्थांचा निर्माल्य संकलन उपक्रम

डोंबिवलीगणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करून त्याचे खत करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने डोंबिवली परिसरात महापालिका प्रशासन, शाळा आणि सुमारे शंभर स्वयंसेवकांच्या माध्यमातून यंदाही अडीच दिवसात ७हजार ५५० किलो निर्माल्य संकलित।केले असून २३५० किलो प्लास्टिक जमा केले आहे. यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमाला सहकार्य करत निर्माल्य जमा केले आहे.

डोंबिवलीतील पर्यावरण दक्षता मंडळ, ऊर्जा फाऊंडेशन, श्री लक्ष्मी नारायण संस्था। आणि स्वच्छ डोंबिवली अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीतील १५ शाळांमध्ये पर्यावरण शाळा उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत १५०० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असताना शाडू गणेशमुर्तीचे महत्त्व, सजावट, विसर्जन, निर्माल्याची व्यवस्था, एकल वापर उत्पादनांमुळे होणारी पर्यावरणाची हानी अशा सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करुन उपाययोजनेविषयी माहिती देण्यात आली.

आपल्या सणांच्या प्रत्येक घटकाचे पर्यावरणपूरक पर्याय काय असू शकतात आणि ते का वापरावेत या विषयावर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आला. या अभियाांतर्गत डोंबिवलीतील ७ शाळांमध्ये पर्यावरणपूरक शाडू मातीची गणेशमुर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना निर्माल्य संकलनासाठी कागदी पिशवी तयार करण्याचे प्रत्यक्षिक दाखविण्यात आले. आता ठिकठिकाणी खाडीवरील गणेशघाट तसेच जेथे विसर्जन।केले जाते अशा सर्व ठिकाणी निर्माल्य संकलन केले जात आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे