शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

द बर्निंग कारचा थरार; आगीत चारचाकी वाहनाचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

By अजित मांडके | Updated: October 10, 2022 14:23 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरून चाललेल्या धावत्या चारचाकी वाहनाला आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरून चाललेल्या धावत्या चारचाकी वाहनाला आग लागली. गाडीला आग लागल्याचे निर्दशनास येताच गाडीतील चालक शकील जाकिर खाटीक.(२५) आणि हमजा मुजार शेख. (२४) या दोघांनी गाडी बाजूला करून गाडीतून बाहेर धाव घेतली. 

ते कल्याण येथील रहिवासी आहेत. या आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही घटना रविवारी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास दिवा अंजुर येथे घडली. मुंबई-नाशिक महामार्ग, द मुंबई ढाबा जवळ, मोदी होंडाई शोरूम समोर, अंजुर, दिवा येथे ठाण्यातून कल्याणकडे चाललेल्या धावत्या कारला आग लागल्याची माहिती मिळताच,घटनास्थळी नारपोली पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेतली. ज्यावेळी कारला आग लागली त्यावेळी कारमधून दोघे प्रवास करत होते. त्या दोघांनी गाडीतून बाहेर धाव घेतली. 

तर,घटनास्थळी पोहोचल्यावर  आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी चारचाकी वाहनाला लागलेली आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. पण, आगीत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :thaneठाणे